Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

निकालाचं शिवसेनेकडून स्वागत! आता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

निकालाचं शिवसेनेकडून स्वागत! आता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

 कोर्टाच्या निर्णयाचं शिवसेना स्वागत करते. कोर्टानं सर्वांना निर्दोष सोडलं आहे.

कोर्टाच्या निर्णयाचं शिवसेना स्वागत करते. कोर्टानं सर्वांना निर्दोष सोडलं आहे.

कोर्टाच्या निर्णयाचं शिवसेना स्वागत करते. कोर्टानं सर्वांना निर्दोष सोडलं आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई, 30 सप्टेंबर: बहुप्रतिक्षित बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी (Babri Demolition Case) बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासहसर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा..महिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

संजय राऊत यांनी सांगितलं की, कोर्टाच्या निर्णयाचं शिवसेना स्वागत करते. कोर्टानं सर्वांना निर्दोष सोडलं आहे. कोर्टानं कट नसल्याचे सांगितलं आहे. आता 'त्या' (बाबरी मशीद विध्वंस) घटनेला विसरायला हवं. लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यामुळे संजय राऊत यांनी सगळ्यांचं अभिनंदनही केलं आहे. आम्हालाही हाच निर्णय अपेक्षित होता, असंही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आश्चर्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि कामगार व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बाबरी विध्वंस प्रकरणाच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. 'देशातील न्यायालयांकडून निर्णय येतात. त्यावरून आश्चर्य नाही. या घटनेचे सगळीकडे व्हिडिओ आहे. तरी पुरावे नाही असं न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणावर न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे आश्चर्य वाटत नाही', असं मलिक म्हणाले.

दरम्यान, 6 डिसेंबर 1992 रोजी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

साध्वी ऋतंभरा यांच्यासमवेत 18 आरोपी कोर्टात उपस्थित होते तर अडवाणी यांच्यासह काही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी तब्बल 2000 पानांचा निकाल कोर्टात वाचण्यात आला. कोर्टानं यावेळी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत हा पूर्वनियोजित कट नसल्याचे जाहीर केलं आहे.

याआधी सेशन ट्रायल क्रमांक 344/1994, 423/2017 आणि 726 / 2019 सरकार विरुद्ध पवन कुमार पांडे आणि वरील प्रकरणातील सर्व साक्ष 16 सप्टेंबर रोजीच्या सुनावणीत संपल्या होत्या,. त्यानंतर सुरेंद्र कुमार यादव, पीठासीन अधिकारी, विशेष न्यायालय, अयोध्या केस लखनऊ यांनी 30 सप्टेंबर 2020 रोजी निर्णय देण्याची तारीख निश्चित केली. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. त्यापैकी 32 सध्या जिवंत आहेत आणि 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या खटल्यात भाजप नेते एल के अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती या दिग्गजांची आरोपी म्हणून नावं होती.

हे होते बाबरी मशीद प्रकरणातील 32 आरोपी

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडे, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुरसिंग, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रजभूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडे, अमर नाथ गोयल, जयभानसिंग पवईया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला , आरएन श्रीवास्तव, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीरकुमार कक्कर आणि धर्मेंद्रसिंग गुर्जर.

या 17 आरोपींचे झाले आहे निधन

सीबीआयने जाहीर केलेल्या 49 आरोपींपैकी 17 जणांचे निधन झाले आहे. यात अशोक सिंघल, गिरीराज किशोर, विष्णू हरी डालमिया, मोरेश्वर सवाईन, महंत अविद्यानाथ, महामंडलेश्वर जगदीश मुनि महाराज, बैकुंठ लाल शर्मा, परमहंस रामचंद्र दास, डॉ सतीश. नगर, बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन एसएसपी डीबी राय, रमेश प्रताप सिंह, महात्यागी हरगोविंद सिंह, लक्ष्मी नारायण दास, राम नारायण दास आणि विनोद कुमार बन्सल यांचे निधन झाले आहे.

हेही वाचा..भीषण अपघात! शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू

6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं?

अयोध्येत 6 डिसेंबर 1992 लाखोंच्या संख्येने हिंदू कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं, जे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत. देशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. यांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. सकाळी साडे दहा वाजता हजारो कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला आणि घुमटापर्यंत पोहोचले. प्रत्येकाच्या मुखात त्यावेळी 'जय श्री राम'चा नारा होता.अयोध्येतील वादग्रस्त वास्तूपर्यंत पोहचलेला जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. वादग्रस्त वास्तूजवळ जवळपास दीड लाख कारसेवक जमा झाले होते. त्यामुळे वास्तूच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. त्यावेळी अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती.

First published:

Tags: Ram mandir and babri masjid, Sanjay raut, Shiv sena