Home /News /maharashtra /

Hathras Gang Rape: महिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

Hathras Gang Rape: महिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे.

सोलापूर, 30 सप्टेंबर: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras Gangrape Case) एका 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे. पीडितेची मंगळवारी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या घटनेनं देश सुन्न झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी तीन सदस्यीय एसआयटीची (SIT) स्थापन केली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दुसरीकडे, या घटनेवरून कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपसह युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनात यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही प्रणिती शिंदे यांनी केली आहे. हेही वाचा..भीषण अपघात! शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, युपीत महिला आणि दलितांवर सातत्याने अत्याचार केले जात आहेत. त्यात हाथरस येथे दलित मुलीवर झालेल्या गॅंगरेप करण्यात आला, ही घटना तर अत्यंत भयावह आहे. पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. युपी पोलिसांनी पीडितेची तक्रार न घेतल्यानं ही घडला घडली आहे. धक्कादायक म्हणजे स्थानिक प्रशासनानं पीडितेच्या पार्थिवावर परस्पर अंत्यसंस्कार केले. कुटुंबीयांना तिचं अंत्यदर्शनही घेऊ दिलं नाही. कुटुंबीयांना दूर ठेवत जबरदस्ती केले पीडितेवर अंत्यसंस्कार हाथरस प्रकरणात यूपी पोलिसांवर अनेक आरोप केले जात आहेत. रात्री उशीरा पीडितेचा मृतदेह तिच्या गावी पोहोचला. मात्र यावेळी पोलिसांनी पीडितेच्या पार्थिवावर परस्पर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह घरी नेण्याची परवानगीही दिली नसल्याचे कुटुंबीयांचं म्हणणं आहे. पीडितेच्या अंत्यसंस्काराचे अनेक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले गेले आहेत, यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी लोकं रस्त्यावर उतरून पीडितेच्या न्यायाची मागणी करत आहेत. 'मृतदेह जास्त काळ ठेवू शकत नाही' सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओंपैकी एकात पोलीस अधिकारी पीडितेच्या कुटूंबाला असा सल्लाही देत ​​आहेत की, "जास्त काळ मृतदेह ठेवणे योग्य नाही. प्रत्येक गोष्ट प्रथेनुसार असावी". एका व्हिडीओमध्ये पीडित तरुणीची आई पोलिसांनी विनवण्या करताना दिसत आहेत. यात त्या, "माझ्या मुलीला एकदा घरी घेऊन जाऊ दे. अंत्यसंस्कार करण्याची एवढी घाई का? आता रात्र झाली आहे...घाई कशाला करत आहात? याला उत्तर देताना पोलीस अधिकारी म्हणाले की, 'मी राजस्थानचा आहे. प्रथेनुसार मृतदेह जास्त काळ ठेवला जात नाही". पोलिसांनी केलेल्या या अरेरावीनंतर सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जात आहे. हेही वाचा..बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता नरेंद्र मोंदींनी घेतली दखल... उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनीच ट्विट करत ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितलं असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या