Home /News /maharashtra /

भीषण अपघात! शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू

भीषण अपघात! शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू

तपन पटेल हे शिवसेनेचे दिवंगत माजी खासदार मुकेश पटेल यांचे चिरंजीव तर माजी मंत्री अमरीश पटेल यांचे पुतणे होत.

धुळे, 30 सप्टेंबर: मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात शिरपूरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि नगरपालिकेच्या बांधकाम समितीचे सभापती तपन पटेल यांचा जागीच मृत्यू झाला. तपन पटेल हे शिवसेनेचे दिवंगत माजी खासदार मुकेश पटेल यांचे चिरंजीव तर माजी मंत्री अमरीश पटेल आणि उपनगराध्यक्ष भूपेश पटेल यांचे पुतणे होत. हेही वाचा...मुंबई पालिका स्थायी समितीची निवडणूक,सेनेकडून तिसऱ्यांदा भरला 'या' नेत्याने अर्ज मिळालेली माहिती अशी की, तपन पटेल हे सावळदे निम्स कॅम्पमधून घराकडे जात असताना महामार्गावर शिरपूर टोल नाक्याजवळ हॉटेल गॅलेक्झीसमोर त्यांच्या गाडी दुभाजकावर आदळली. अपघात एवढा भीषण होता की, तपन पटेल यांचा जागेवर मृत्यू झाला. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारात ही घटना घडली. अपघातात गाडीचा पुढचा भाग चक्काचूर झाली असून गाडीची दोन्ही चाकं निखळली आहेत. घटनेचा माहिती मिळताच त्यांचे नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तपन पटेल यांना तातडीने नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपन यांना मृत घोषित केलं. तपन पटेल यांची अंत्यविधी आज (बुधवारी) सायंकाळी 5 वाजता आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजच्या प्रांगणात करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यात येणार आहे. तपन पटेल हे पाहुण्यांना सोडण्यासाठी सावळदे येथील मुकेश पटेल कॅम्पमध्ये सोडण्यासाठी गेले होते. मात्र, घराकडे परत येताना त्यांच्यावर काळानं घाला घातला. गाडीचा वेग जास्त असल्यानं तपन यांचा वाहनावरील ताबा सुटून गाडी दुभाजकावर आदळली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. हेही वाचा...ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नसल्यामुळे दहावीत शिकणाऱ्या साक्षीची आत्महत्या तपन पटेल यांच अपघाती निधन झाल्यामुळे धुळे जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात शोककळा पसरली आहे. तपन यांनी वयाच्या अवघ्या 40 वर्षात राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी कीर्ती मिळवली होती.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Shirpur s13a009

पुढील बातम्या