Home /News /maharashtra /

करुन दाखवलं! होम क्वारंटाईनसाठी शिवसेना खासदारांनी दिलं चक्क स्वतःचं घर

करुन दाखवलं! होम क्वारंटाईनसाठी शिवसेना खासदारांनी दिलं चक्क स्वतःचं घर

खासदार धैर्यशील माने यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांनी नागरिकांना एक आवाहन केलं होतं....

कोल्हापूर, 20 मे: होम क्वारंटाईनसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी स्वतःचं घर दिलं आहे. कोल्हापुरातल्या रुकडी येथे असणारे आपले घर त्यांनी होम क्वारंटाईनसाठी दिलं आहे. होम क्वारंटाइनसाठी स्वतःचं घर देणारे धैर्यशील माने हे देशातील एकमेव खासदार म्हणावे लागतील. त्यामुळे अलगीकरणाच्या नव्या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवातच त्यांनी केली आहे. हेही वाचा... 'हिजडा' शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर.., चक्क तृतीयपंथियाने निलेश राणेंना सुनावलं खासदार धैर्यशील माने यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांनी नागरिकांना एक आवाहन केलं होतं. एखादा व्यक्ती परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येत असेल तर त्याला संबंधित ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण करण्यात येते. मात्र त्यांचा निगेटीव्ह अहवाल आल्यानंतर त्यांना आता त्यांच्या घरी जायची सोय केली जाणार आहे. संबंधित व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीची घरीच सोय करण्यात येणार आहे. मात्र घरातील सदस्यांनी मात्र आपल्या भावकीत किंवा शेजाऱ्यांच्यात काही दिवस राहण्यासाठी जावे, असे आवाहन केले होते. आवाहन केल्यानंतर त्यांनी सुरुवात स्वतःपासूनच केली आहे. त्यांच्या अभिनव अशा कल्पनेनंतर प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. हेही वाचा.. आदित्य ठाकरे आणि भाजप नेत्यात जुंपली, राष्ट्रीय वाद पोचला वैयक्तीक पातळीवर ग्रामस्तरीय समितीच्या प्रभावी कामाला मदत होणार असून कुटुंबाला आणि पर्यायाने गावाला सुद्धा कोणताच धोका होणार नाही, अशा पद्धतीमुळे अलगीकरणाचे नियमांचं तंतोतंत पालण होण्यास सहकार्य करावं. शिवाय सामाजिक एकोपा आणि एकमेकांमधील नाती आणखी दृढ होतील, असे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे. खासदार माने यांच्या या अभिनव कल्पनेचे जिल्ह्यातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Kolhapur, Shiv sena

पुढील बातम्या