'हिजडा' शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर मी सांगते, अशा शब्दात तृतीयपंथियाने निलेश राणेंना सुनावलं!

'हिजडा' शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर मी सांगते, अशा शब्दात तृतीयपंथियाने निलेश राणेंना सुनावलं!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी सध्या विरोधकांवर टीकांचा सपाटा लावला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 मे: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी सध्या विरोधकांवर टीकांचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निलेश राणे यांनी खालच्या पातळीवरच जाऊन टीका केली आहे. एवढंच नाही तर निलेश राणे यांनी ट्वीट करत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चक्क 'हिजडा' असा उल्लेख केला. यावरुन तृतीयपंथिय असलेल्या सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांना चांगलंच सुनावलं आहे.

हेही वाचा.. मुंबईतून धक्कादायक बातमी, पोलिसांपाठोपाठ IAS-IPS अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

'हिजडा' या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर तो मी सांगते. पण आपली बालिशबुद्धी जगावा दाखवू नका. जेव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरवैरा पळतं, तशी तुमची गत झाली आहे. तोंडाला आळा घाला. हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल, असा इशारा सारंग पुणेकर यांनी दिला आहे.

निलेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या विरोधकांवर कडाडून टीका करत आहे. यातूनच निलेश राणे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. एवढंच नाही तर त्यांना हिजडा असं संबोधलं. यावरून सारंग पुणेकर चांगल्याच संतापल्या आहेत. निलेश राणे यांनी तृतीयपंथीयांचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. वंचित, दुर्लक्षित व समाजाने नेहमीच अन्याय केलेला तृतीयपंथी वर्ग आहे. समाज कंटकांकडून तृतीयपंथियांना कायम हिणवलं जातं. मात्र, चक्क माजी खासदार निलेश राणे यांनीही तृतीयपंथियांना हिणवणं चुकीचं आहे. यावरुन सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा.. पुणेकरांना दिलासा! मिळणार 'ही' सूट, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर दररोज उघडणार दुकानं

काय म्हणाले होते निलेश राणे?

First published: May 20, 2020, 11:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading