Home /News /mumbai /

आदित्य ठाकरे आणि भाजप नेत्यात जुंपली, राष्ट्रीय प्रश्नावरचा वाद पोचला वैयक्तीक पातळीवर

आदित्य ठाकरे आणि भाजप नेत्यात जुंपली, राष्ट्रीय प्रश्नावरचा वाद पोचला वैयक्तीक पातळीवर

तुम्ही तरुण आहात. त्यामुळे जरा वेगळे असा असं वाटलं होतं. तुम्ही तुमच्या ट्रोल आर्मी सारखे नसाल, अशी अपेक्षा होती.

    मुंबई/पुणे, 20 मे: शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यावरुन उभय नेत्यांमध्ये सुरु झालेला वाद अखेर वैयक्तीक पातळीवर पोहोचला आहे. आदित्य ठाकरे आणि सिद्धार्थ शिरोळे यांच्या सध्या 'ट्विटर वॉर' सुरु आहे. हेही वाचा.. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. हाँगकाँग, लंडन, सिंगापूर, कुवेत, बांगलादेश, आफ्रिका, अमेरिका, फिलिपाईन्स, अफगनिस्तान, इराण आदी विविध देशांत भारतीय नागरिक अडकले आहेत. त्यांना देशात परत यायचं आहे. परंतु त्यासाठीची प्रक्रिया त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही. केंद्र सरकाने ऑपरेशन वंदे मातरम सुरू केले आहे. परंतु जे भारतीय परदेशात आहेत. त्यांनी तेथून येथील लोकप्रतिनिधींनी ट्विटरद्वारे टॅग करून मदत करा, अशी मागणी करण्यात प्रारंभ केला आहे. दुसरीकडे, राज्य सरकारकडून परवानगी मिळत नसल्यामुळे काही आंतरराष्ट्रीय विमाने मुंबईत लॅन्ड होऊ शकत नाहीत, असा आरोप भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केला. यामुळेच महाराष्ट्रीय नागरिकांची गैरसोय होत असल्याचंही आमदार शिरोळे यांनी म्हटलं. उजव्या हातालाही कळत नाही की डावा हात काय करत आहे, इतका गोंधळ राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु आहे, अशी खोचक टीका केली. मंत्रिमंडळातील काही विभाग तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियंत्रणापलिकडे गेले आहेत. सरकारमध्ये नेतृत्त्वाचा अभाव असल्याचं वक्तव्य आमदार शिरोळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. आदित्य ठाकरेंनी असं दिलं प्रत्युत्तर... आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केलेल्या टिप्पणीला आदित्य ठाकरे यांनी जशास तसं असं प्रत्युत्तर दिलं. तुम्ही तरुण आहात. त्यामुळे जरा वेगळे असा असं वाटलं होतं. तुम्ही तुमच्या ट्रोल आर्मी सारखे नसाल, अशी अपेक्षा होती. लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी राज्य सरकार केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या संकटकाळात तुम्ही ब्लेम गेम खेळू नका, राजकारण बाजुला ठेवून तुम्ही हे समजून घ्यायला हवं होतं, असा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा समाचार घेतला आहे. हेही वाचा... केंद्र सरकारने वंदे मातरम उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 12 विमानांतून 1956 नागरिकांना मायदेशात परत आणले. आणखी 14 विमानाचं नियोजन केंद्र सरकार करत असल्याची माहिती देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Aaditya thackeray

    पुढील बातम्या