मुंबई पालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक रंगणार, सेनेकडून तिसऱ्यांदा भरला 'या' नेत्याने अर्ज

मुंबई पालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक रंगणार, सेनेकडून तिसऱ्यांदा भरला 'या' नेत्याने अर्ज

मुंबई महापालिकेतील स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे.

  • Share this:

मुंबई, 30 सप्टेंबर : मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी

यशवंत जाधव यांना तिसऱ्यांदा शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. महापालिका मुख्यालयात यशवंत जाधव यांनी स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी संध्या दोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.'

राज्यात कोरोनाची परिस्थितीत लॉकडाउन लागू झाल्यामुळे राज्यातील सर्व स्थानिक निवडणुकांचा कार्यक्रम हा पुढे ढकलण्यात आला होता. सहा महिन्यानंतर अनलॉकमध्ये अटी शिथिल करण्यात आल्यामुळे राज्यातील पालिकांमध्ये लांबणीवर पडलेल्या स्थायी समितीच्या निवडणुकी पार पडत आहे.

दुचाकी चोरीचा होता संशय, 10 ते 12 जणांच्या टोळक्याने दोघांचे केले अपहरण आणि...

मुंबई महापालिकेतील स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांकडून आज अर्ज भरले जाणार आहे.  शिवसेनेकडून यशवंत जाधव यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस सुद्धा अर्ज भरणार आहे. काँग्रेसच्या वतीने असिफ झकेरिया हे स्थायी समितीसाठी तर संगीता हांडोरे शिक्षण समितीसाठी अर्ज भरणार आहे.  या दोन्ही पदासाठी भाजपकडून अजून नाव निश्चित झाले नाही.

पराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज सकाळी यशवंत जाधव शिवसैनिकांसह  महापालिका मुख्यालयात पोहोचले. त्यानंतर  यशवंत जाधव यांनी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी संध्या दोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

काँग्रेस आणि भाजपने उमेदवार उभे केल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह आहे.

Published by: sachin Salve
First published: September 30, 2020, 11:58 AM IST
Tags:

ताज्या बातम्या