मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नसल्यामुळे दहावीत शिकणाऱ्या साक्षीची आत्महत्या

ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नसल्यामुळे दहावीत शिकणाऱ्या साक्षीची आत्महत्या

वडिलांचे छत्र हरपल्यापासून आई स्वाती पोळ आपल्या दोन्ही मुलांना घेऊन कष्ट करून उदरनिर्वाह करीत आहेत.

वडिलांचे छत्र हरपल्यापासून आई स्वाती पोळ आपल्या दोन्ही मुलांना घेऊन कष्ट करून उदरनिर्वाह करीत आहेत.

वडिलांचे छत्र हरपल्यापासून आई स्वाती पोळ आपल्या दोन्ही मुलांना घेऊन कष्ट करून उदरनिर्वाह करीत आहेत.

कराड, 30 सप्टेंबर : कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्वत्र ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. कराड तालुक्यातील ओंड इथं दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिंनीकडे ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नसल्याने तिने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या धक्कादायक घटनेने कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव साक्षी आबासो पोळ असं आहे. साक्षीच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. साक्षीचे वडील आबासो बाळकू पोळ यांचा 2007 साली मृत्यू झाला होता. त्यामुळे वडिलांचे छत्र हरपल्यापासून आई स्वाती पोळ आपल्या दोन्ही मुलांना घेऊन कष्ट करून उदरनिर्वाह करीत आहेत.

अजितदादांनी आता गजराचे नाही तर टोल्यांचे घड्याळ भिंतीवर लावले,सेनेचा भाजपला टोला

कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने शाळांचे शिक्षक हे ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. साक्षीकडे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाइल नव्हता. त्यामुळे ती नैराश्यात होती.

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा आज निकाल; अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आहेत आरोपी

मोबाइल नसल्याने तिला अभ्यास करता येत नव्हता. त्यामुळे शाळेतील शिक्षकाचे वर्गही तिला जॉईन करता येत नव्हते. आई कामानिमित्त बाहेर गेली असताना साक्षीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. कराड ग्रामीण पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

First published:
top videos