मुंबई, 24 ऑगस्ट: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Cm Uddhav Thackeray) केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक (Shivsena) चांगलेच संतापलेत. तीनहून अधिक ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. तसंच शिवसेना नेतेही यावर आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेना प्रवक्त्या डॉ.मनीषा कायंदे (Dr.Manisha Kayande) यांनीही नारायण राणे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
नारायण राणे यांचा फुगा फुटलेला आहे आणि तो सामान्य शिवसैनिकांनीच फोडलेला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत, असं मनीषा कायंदे म्हणाल्यात.
शिवसेना नेते खवळले, नारायण राणेंविरोधात मुंबईतल्या भरचौकात बॅनर
दिल्लीश्वरांच्या समोर त्यांना मुजरा करावा लागतोय आणि मंत्रीपद टिकवायचा असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्री आणि शिवसेना यांच्यावर त्यांना सतत टीका त्यांना करावी लागणार आहे आणि तसं केलं नाही तर त्यांचे मंत्रीपद देखील टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया मनीषा कायंदे यांनी दिली आहे.
मनीषा कायंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा Video
नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसेना आमदार तथा प्रवक्ता डॉ. मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया pic.twitter.com/tcBDqU3MYI
— News18Lokmat (@News18lokmat) August 24, 2021
मनीषा कायंदे प्रतिक्रिया देताना व्हिडिओमध्ये काय म्हणाल्यात
नारायण राणे यांचा फुगा फुटलेला आहे आणि तो सामान्य शिवसैनिकांनीच फोडलेला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत. सामान्य शिवसैनिकांनीच त्यांचा फुगा फोडलेला आहे. दिल्लीश्वरांचे समोर त्यांना मुजरा करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणतंही काम राहीलेलं नाही. त्यांच्यावर एकच जबाबदारी दिली आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करा. मातोश्रीवर टीका करा आणि शिवसेनेवर टीका करा. हेच त्यांचं ऑक्सिजन आहे. आणि हे त्यांनी केलं नाही तर त्यांचं मंत्रीपद जाणार आहे. त्यामुळे मंत्रीपद टिकवण्यासाठी त्यांना हे करावंच लागणार त्यामुळे नारायण राणे काय करतायत त्याची आम्हाला अजिबात चिंता नाही.
संपूर्ण डोंगर कोसळतानाचा थरारक Live Video कॅमेऱ्यात कैद
नेमकं काय म्हणाले केंद्रीय मंत्री
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात संबोधित करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यांनी हिरक महोत्सव म्हटलं. त्या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अमृत महोत्सव असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मग मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. यावर जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेखही केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.