उत्तराखंड, 24 ऑगस्ट: उत्तराखंडच्या चंपावतमध्ये स्वाला येथे भूस्खलनाची मोठी घटना घडली आहे. भूस्खलनानंतर टनकपुर-चंपावत राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. जिल्हा दंडाधिकारी विनित तोमर यांनी सांगितलं की, दरड हटवण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. मी संबंधित अधिकार्यांना वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्याचे निर्देश दिले आहेत.
सोमवारी सकाळी चंपावत-टनकपुर महामार्गावर स्वाला जवळील डोंगराच्या भागाला तडा गेली होती. दिवसभर दगड पडणं सुरुच होतं. यामुळे वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र काही वेळानंतर भूस्खलनामुळे संपूर्ण डोंगर तुटला. यामुळे संपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर दरड झाल्याचं चित्र आहे. सध्या दरड हटवण्याचं काम सुरु झालं आहे.
#WATCH | Tanakpur-Champawat national highway was blocked following a landslide near Swala in Champawat, Uttarakhand today
"It would take at least two days to clear the debris. I have instructed officials concerned to divert the traffic to another route," says DM Vineet Tomar pic.twitter.com/Bndohy4fj5 — ANI (@ANI) August 23, 2021
पाऊस नसतानाही दरड कोसळली
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस झालेला नाही. पण डोंगरावरून दरड कोसळत आहे. सोमवारी सकाळी जवळपास 8.30 वाजता डोंगराचा एक मोठा भाग रस्त्यावर कोसळला. यावेळी जवळपास 100 मीटर पर्यंतचा परिसर पूर्णपणे दरडीनं व्यापून गेला. ऑलवेदर रोड बनवणाऱ्या संस्थेनं दरड हटवण्याचं काम सुरु केलं आहे. जेसीबी आणि पोकलॅंड मशीनद्वारे डेब्रिज काढले जात आहे.
हेही वाचा- शिवसेना नेते खवळले, नारायण राणेंविरोधात मुंबईतल्या भरचौकात बॅनर
रस्ता बंद झाल्याच्या वृत्तानंतर वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून सर्व वाहने काकरालीगेट येथे थांबवण्यात आली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttarakhand