मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुख्यमंत्र्यांवर केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य नारायण राणेंना भोवणार, दादरमध्ये लागले 'कोंबडी चोर' चे बॅनर

मुख्यमंत्र्यांवर केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य नारायण राणेंना भोवणार, दादरमध्ये लागले 'कोंबडी चोर' चे बॅनर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झालेत. याचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झालेत. याचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झालेत. याचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई, 24 ऑगस्ट: केंद्रीय मंत्री नारायण राणे(Union Minister Narayan Rane) यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झालेत. याचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत दादर टी टी भागात स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचे मोठे फोटो बॅनर लावलेत. या बॅनरवर "कोंबडी चोर !!!" असं नारायण राणेंना झोंबणारे शब्दं लिहीलेत.

या सगळ्यामुळे मुंबईत वातावरण तणावपुर्ण झालंय. याचे पडसाद आणखीन तीव्र उमटण्याचीही शक्यता व्यक्तं केली जातेय.

नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी नाशिक येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Case registered against Narayan Rane) करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी नाशिकातील सायबर पोलिसांत (Nashik Cyber Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय म्हणाले केंद्रीय मंत्री

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात संबोधित करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यांनी हिरक महोत्सव म्हटलं. त्या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अमृत महोत्सव असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मग मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. यावर जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेखही केला.

First published:

Tags: Narayan rane, Shivsena, Uddhav Thackeray (Politician)