जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाकरे गटाला नवं नाव मिळताच किशोरी पेडणेकर पेटून उठल्या; गाण्यातून खुलं चॅलेंज, पाहा Video

ठाकरे गटाला नवं नाव मिळताच किशोरी पेडणेकर पेटून उठल्या; गाण्यातून खुलं चॅलेंज, पाहा Video

ठाकरे गटाला नवं नाव मिळताच किशोरी पेडणेकर पेटून उठल्या; गाण्यातून खुलं चॅलेंज, पाहा Video

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नवीन नाव आणि चिन्ह दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 ऑक्टोबर : ठाकरे आणि शिंदे वादामध्ये निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं, तसंच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यावरही बंदी घालण्यात आली. यानंतर आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी नावं दिली आहेत, तर ठाकरे गटाला निवडणुकीसाठी नवीन चिन्हही दिलं आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे. तसंच ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह मिळालं आहे. ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी गाण्याच्या माध्यमातून शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ‘काळरात्र होता होता, उषःकाल झाला, अरे पुन्हा शिवसैनिकांनो, पेटवा मशाली’, असं गाणं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

जाहिरात

ठाकरेंच्या गटाची धगधगती मशाल; नव्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या चिन्हाचा First Look ‘आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव मिळालं. पहिली लढाई खरी जिंकली. ज्यांनी आपल्या पक्षात काळरात्र करण्याचं ठरवलं तो उष:काल आतापासून सुरू झाला आहे. आयुष्याच्या मशाली पेटवा आणि दाखवा, ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आहे’, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह दिलं आहे, पण एकनाथ शिंदे गटाला अजून कोणतंही चिन्ह देण्यात आलेलं नाही. निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून नव्याने तीन चिन्ह द्यायला सांगण्यात आली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात