नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पहिल्या पसंतीची त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्यानंतर आता ठाकरे गटाने दिलेल्या दुसऱ्या पसंतीवर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाला धगधगती मशाल शिवसेनेच्या ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून पेटती मशाल देण्यात आली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या पक्षाचं नाव असणार आहे. तर शिंदे गटाला नव्याने तीन चिन्ह देण्यास निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली. वाचा -
उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; शिंदे गटाला मिळालं बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही तीन चिन्ह पाठवण्यात आली, तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. शिंदे गटाकडून सुद्धा उगवता सूर्य, गदा आणि त्रिशूळ ही तीन पक्ष चिन्ह मागण्यात आली होती. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी 3 नावं शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पाठवली आहेत. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे.
निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे कोर्टात निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातले वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेनं आता दिल्ली हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. दिल्ली हायकोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण अखेरीस आता दिल्ली हायकोर्टामध्ये शिवसेनेनं याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी दिली.