सांगोला 02 ऑगस्ट : शिवसेना नेते संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा ईडीने अटक केली. यानंतर सोमवारी त्यांना कोर्टाने ४ ऑगस्टपर्यंतची ईडी कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ घोटळाप्रकरणी ईडी सध्या राऊतांची चौकशी करत आहे. दरम्यान, या प्रकरणावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी राऊतांचं समर्थन करत हे राजकीय हेतूने केल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी राऊतांवर टीका केली आहे. अशात आता सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही राऊतांवर टीका केली आहे.
अशोक चव्हाणांच्या मनात काय? भाजप प्रवेशाच्या चर्चेवर दिलेल्या उत्तरामुळे वाढला संभ्रम!
खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राऊतांचा समाचार घेतला. राऊत म्हणजे भोंगा नाही, तर राज्याला लागलेली किरकिर होती, असा टोला त्यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावताना आता रोज सकाळी वाजणारा भोंगा बंद पडला, असं म्हटलं होतं. याच मुद्द्यावर बोलत पाटील यांनीही राऊतांवर निशाणा साधला.
यासोबतच त्यांनी आदित्य ठाकरेंनाही सल्ला दिला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जात शिवसैनिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. ते बंडखोर आमदारांवर सडकून टीकाही करत आहेत. यादरम्यान पाटील यांनी आदित्य ठाकरेंना एक सल्ला दिला आहे.
संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर आता राहुल गांधी मैदानात, ट्विट करत म्हणाले..
शहाजी बापू पाटील म्हणाले, की आदित्य ठाकरे यांनी आजोबा बाळासाहेब ठाकरे यांची नक्कल न करता तळागाळात जाऊन शिवसेना बांधावी आणि मग ठाकरी शैलीत बोलावं. पुढे ते म्हणाले, राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याबद्दल केलेलं भाकीत खरं ठरलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Sanjay raut