जाहिरात
मराठी बातम्या / देश / संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर आता राहुल गांधी मैदानात, ट्विट करत म्हणाले..

संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर आता राहुल गांधी मैदानात, ट्विट करत म्हणाले..

संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर आता राहुल गांधी मैदानात, ट्विट करत म्हणाले..

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीची कोठडी (Sanjay Raut ED Custody) सुनावण्यात आली आहे. राऊत यांच्या कारवाईवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 ऑगस्ट : ईडीने रविवारी मोठी कारवाई करत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. तब्बल 15 ते 16 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. राऊत यांना अटक केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी भेट दिली. यावेळी कुटुंबीयांना आधार देत त्यांच्यासोबत उभे असल्याचा विश्वासही दिला. यानंतर दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील संजय राऊत यांच्या कारवाईचा निषेध करत केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. काय आहे राहुल गांधी यांचे ट्विट? काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेची बातमी ट्विट करत त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. यासोबत केंद्रसरकारवर सडकून टीका देखील केली आहे. ‘राजा’चा संदेश स्पष्ट आहे, जो माझ्याविरुद्ध बोलेल त्याला त्रास होईल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचे मनोधैर्य खचविण्याचे आणि सत्य दाबण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, हुकूमशहा ऐक, शेवटी ‘सत्या’चाच विजय होतो आणि अहंकार हरतो. या ट्विटद्वारे राहुल गांधी यांनी थेट मोदी यांनाच आव्हान दिलं आहे. HDIL, प्रविण राऊत ते संजय राऊत, पैशांचा व्यवहार कसा झाला? ED चा कोर्टात गंभीर आरोप संजय राऊतांना 4 ॲागस्टपर्यंत ईडी कोठडी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. रविवारी संजय राऊत यांच्या निवासस्थानी कसून चौकशी केली गेली. यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. आज सोमवारी दुपारी 2 वाजता संजय राऊत यांना कोर्टात आणण्यात आले. तर, 2 वाजून 15 मिनिटांनी त्यांना कोर्ट रुम नंबर 16 मध्ये विशेष इडी न्यायालयात हजर केलं गेलं. यावेळी ईडीने संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला. कोर्टाने आता संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे

जाहिरात

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात प्रविण राऊत फक्त नावाला होते. हे सगळे व्यवहार संजय राऊत यांनीच केले, असा गंभीर आरोप ईडीने केला आहे. ईडीने संजय राऊत यांची 8 दिवसांची ईडी कोठीच मागितली. राऊत कुटुंबाला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे, असा दावाही ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी केला आहे. सकाळी 10 ते रात्री 10 या दरम्यान संजय राऊत यांची चौकशी केली जाईल आणि ते त्यांच्या वकीलांना सकाळी 8.30 ते 9.30 या काळात भेटू शकतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात