शरद पवारांचा भाजपसह मनसेला धक्का! माजी आमदारासह संपर्कप्रमुख राष्ट्रवादीच्या गळाला

शरद पवारांचा भाजपसह मनसेला धक्का! माजी आमदारासह संपर्कप्रमुख राष्ट्रवादीच्या गळाला

राष्ट्रवादी काँग्रेसनं एका दगडात दोन शिकार केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसह मनसेला धक्का दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 9 सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसनं एका दगडात दोन शिकार केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसह मनसेला धक्का दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सांस्कृतिक विभागाचे ठाणे, रायगड, पालघर संपर्कप्रमुख डॉ. ओमकार हरी माळी आणि उद्योजक पंकज सिन्हा यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तर नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा... मोठी बातमी! या वर्षासाठी मराठा आरक्षण नाही; कोर्टाने दिली तात्पुरती स्थगिती

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर तांगुळी, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार महिला जिल्हाध्यक्षा हेमलता पाटील उपस्थित होते.

दुसरीकडे, कोरोनाच्या ब्रेकनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे राज यांनी गेल्या आठवड्यात औरंगाबादेत शिवसेना धक्का दिला होता. औरंगाबाद शिवसेनेत उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदे भूषवलेल्या सात बड्या शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला होता.

औरंगाबादेतील शिवसेना आणि पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मनसेत प्रवेश केला. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं शिवसेनेचे माजी खासदार आणि गटनेते चंद्रकांत खैरे यांना धक्का दिला आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने कबंर कसली आहे.

हेही वाचा...शिवसेनेची तलवार म्यान! कंगनाविरोधात एअरपोर्टवर आंदोलन करु नका, पक्षादेश

निष्ठावंतानीच शिवसेनेला दिली सोडचिठ्ठी...

शिवसेनेच्या निष्ठावंतांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन मनसेत प्रवेश केला आहे. यात काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा शिवसेना आणि चंद्रकांत खैरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ही समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गेल्या फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: September 9, 2020, 3:43 PM IST

ताज्या बातम्या