Home /News /maharashtra /

कोरोनावर इंजेक्शन निघालं, पण ते आपल्याला परवडणारं नाही; शरद पवारांचा मोठा खुलासा

कोरोनावर इंजेक्शन निघालं, पण ते आपल्याला परवडणारं नाही; शरद पवारांचा मोठा खुलासा

आता आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार आहे. आत्मविश्वासानं उभं राहणं, स्वत:ची काळजी घेणं, हाच पर्याय आहे.

    सातारा, 27 जून: कोरोना विषाणूनं संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आणखी मोठी भर पडणार आहे, अशी आरोग्य यंत्रणेने मोठी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनावर इंजेक्शन निघालं आहे. पण ते आपल्याला परवडणारं नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. हेही वाचा...शरद पवारांचे एका दगडात दोन पक्षी, सत्तास्थापनेच्या दाव्यावर फडणवीसांनाही टोला शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. पत्रकार परिषदेला संबोधित करतांना ते म्हणाले की, आता आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार आहे. आत्मविश्वासानं उभं राहणं, स्वत:ची काळजी घेणं, हाच पर्याय आहे. कोरोनावर इंजेक्शन निघालं आहे. पण, आपल्याला ते परवडणारं नाही. आपल्या देशात मिळत नाही. 30 ते 35 हजार रुपये आपल्या माणसाला परवडणारं नाही. मुंबई-पुण्यातून बाहेर गेलेली लोक पुन्हा येऊ लागली आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण आणखी वाढण्याची भीती शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. कोरोना सगळीकडे सारखा आहे. पण इथले माध्यम जास्त जागरूक आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांना जास्त भीती होती, इथला कोरोना बाहेर गेला, अशा शब्दांत शरद पवार यांनी माध्यमांनाही टोला लगावला. शरद पवार यांनी सांगितलं की, घरात बसून त्यांनी खूप काम केलं. राज्याच्या बाहेर देशाच्या बाहेर अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणलं. बाहेरच्या राज्यातल्या लोकांचा संपर्क असल्यानं बाहेर अडकलेल्या लोकांना पुन्हा मायदेशात आणता आलं. upsc साठी बाहेर अडकलेल्या राज्यात आणण्यासाठी जास्त वेळ गेला. शरद पवारांचे एका दगडात दोन पक्षी... दुसरीकडे, गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांनी सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खोचक टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे. गोपीचंद पडळकरांना काही महत्त्व देण्याची गरज नाही, त्यांचं अनेकवेळा बारामतीत डिपॉझिट जप्त झालं आहे. 'कशाला बोलायचं.', अशा म्हणत शरद पवार यांनी पलटवार केला आहे. हेही वाचा...माऊलींच्या पादुका हेलिकॉप्टरमधून नाही, शिवनेरी बसनं पंढरपूरला जाणार दरम्यान, शरद पवार यांच्याविषयी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Sharad pawar

    पुढील बातम्या