पुणे, 27 जून: आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या पादुकां आषाढ शुद्ध दशमीला (30 ) आळंदीतून पंढरपूरला निघणार आहेत. मात्र, पादुका हेलिकॉप्टर की बसने जाणार असा संभ्रम होता. पण आता हा संभ्रम दूर झाला आहे. माऊलींच्या पादुकांचं प्रस्थान हेलिकॉप्टरमधून नाही तर शिवनेरी बसमधून होणार असल्याची माहिती पालखी सोहळ्याचे विश्वस्त अॅड. विकास ढगे-पाटील यांनी ‘न्यूज18 लोकमत’ला दिली आहे. हेही वाचा.. शरद पवारांचे एका दगडात दोन पक्षी, सत्तास्थापनेच्या दाव्यावर फडणवीसांनाही टोला पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांनी सांगितल की, 20 मानकऱ्या समवेत 30 जूनला सकाळी 10 वाजता माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. विशेष म्हणजे माऊलींची पालखी शिवनेरी बसनं नियमित रस्त्याने पंढरपूरकडे रवाना होणार आहे. माऊलींचा पालखी सोहळा किमान वाखरीपासून तरी पालखी पायी चालत नेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी विश्वस्तांनी शासनाकडे केली आहे. दुसरीकडे, जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी मात्र शासन जे वाहन देईल, त्याने जाणार असल्याची माहिती सोहळ्याचे ट्रस्टी अनंत मोरे यांनी दिली आहे. पोलिस ठरवतील तसं होईल… दोन्हीही पादुका पोलिस ठरवतील त्याच मार्गाने नेल्या जातील. पादुका ज्या वाहनातून जातील त्या वाहनांच किंवा वाहन थांबून दर्शन घेण्याचा कोणत्याही नागरिकांनी प्रयत्न करू नये. आतापर्यंत भाविकांनी ज्या पद्धतीने सहकार्य केलं ते मुख्य प्रस्थानाच्या दिवशीही करावे, असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक महेसेकर यांनी केलं आहे. हेही वाचा… घरबसल्या रेशन कार्डावर जोडा कुटुंब सदस्याचे नाव, वाचा काय आहे प्रक्रिया दरम्यान, कोरोना विषाणूमुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी वारी पायी निघत नाही आहे. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ऊन, वारा, पाऊस अशा कशाचीही तमा न बाळगता वारकरी कुठल्याही संकटाची पर्वा न करता अतिशय आनंदात या सोहळ्यात सहभागी होत असतात. काळाबरोबर चालणारा आणि अतिशय विचारी आणि सर्वसमावेशक अशी प्रतिमा असलेल्या वारकरी समाजाने सध्याचं कोरोनाचं संकट लक्षात घेऊन सरकारला साथ देत यंदा वारी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.