शरद पवारांचे एका दगडात दोन पक्षी, सत्तास्थापनेच्या दाव्यावर फडणवीसांनाही टोला

शरद पवारांचे एका दगडात दोन पक्षी, सत्तास्थापनेच्या दाव्यावर फडणवीसांनाही टोला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.

  • Share this:

सातारा, 27 जून: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांनी सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खोचक टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे.

हेही वाचा...शहीद जवानाच्या कुटुंबाकरता उभं राहिलं केंद्र सरकार, मदतीसाठी केली मोठी घोषणा

गोपीचंद पडळकरांना काही महत्त्व देण्याची गरज नाही, त्यांचं अनेकवेळा डिपॉझिट जप्त झालं आहे. 'कशाला बोलायचं.', अशा म्हणत शरद पवार यांनी पलटवार केला आहे.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे...

कारखाने चालू न होणे हे देशासाठी चिंताजनक आहे...

आता सर्व व्यवहार चालू झाले पाहिजेत...

बारामतीची निवडणूक लढवली.. डिपॉझिट जप्त झालं...

पडळकरांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही..

पेट्रोल आणि डिझेल दर वाढ याचा परिणाम फक्त गाडीवर होत नसून सर्व गोष्टी वर त्याचा परिणाम होतो....

राजू शेट्टी यांची भेट... आमदारकी बाबत राजू शेट्टी यांच्या पक्षात गैरसमज होते...

इथून पुढे लोकांना कोरोना सोबत जगावं लागणार आहे...

पडळकरांवर गुन्हा दाखल

शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकरांविरोधात राज्यातील पहिला गुन्हा आहे.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कडे कोणतीही विचारधारा नाही. फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत' अशी जहरी टीका पडळकरांनी केली होती.

First published: June 27, 2020, 12:45 PM IST

ताज्या बातम्या