Home /News /maharashtra /

NCP अध्यक्ष शरद पवार यांनी सहकुटुंब घेतलं मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन

NCP अध्यक्ष शरद पवार यांनी सहकुटुंब घेतलं मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन

NCP chief Sharad Pawar News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.

    मुंबई, 12 सप्टेंबर: सध्या राज्यात गणेशोत्सवाचा (Ganesh Utsav 2021) उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यभरात मोठ्या आनंदात हा सण साजरा केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रेटी आणि राजकीय नेत्यांच्या घरी लाडक्या बाप्पा विराजमान (Politician welcomes Ganpati Bappa at home) झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) बाप्पाच्या दर्शनासाठी वर्षा निवासस्थानावर दाखल झाले. शरद पवार यांनी आज सहकुटुंब वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे (Supriya Sule), सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते. भाजपला शह देण्यासाठी शिवसेना पोहोचली थेट उत्तर प्रदेशामध्ये, लढवणार निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहे. जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Sharad pawar, Supriya sule, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या