जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजपला पराभूत करण्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेची एन्ट्री, लढवणार 403 जागांवर निवडणूक

भाजपला पराभूत करण्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेची एन्ट्री, लढवणार 403 जागांवर निवडणूक

भाजपला पराभूत करण्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेची एन्ट्री, लढवणार 403 जागांवर निवडणूक

UP assembly election 2022: उत्तर प्रदेशमध्ये 2022 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उत्तर प्रदेश, 12 सप्टेंबर: शिवसेनेनं (Shivsena) आता उत्तर प्रदेश विधानसभा (UP Assembly Elections) निवडणुकीच्या रिंगणातही एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये 2022 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. शिवसेनेनं उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणूक 2022 मध्ये होणारी निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. शिवसेनेच्या आधी AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. शिवसेनेनं उत्तर प्रदेशामधील सर्वच्या सर्व म्हणजेच 403 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशामधील या निवडणुकीसाठी शिवसेना युती करेल का? तसंच युती केल्यास ती कोणासोबत करेल? हे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र शिवसेनेनं घेतलेल्या निर्णयामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

जाहिरात

शिवसेनेच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या बैठकीत उत्तर प्रदेशच्या सर्व विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. अद्याप हात मिळवणी नाही शिवसेनेनं जरी 403 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी पक्षानं अद्याप कोणासोबतही हातमिळवणी केलेली नाही. मात्र काही दिवसांत शिवसेना युतीसह निवडणूक लढवू शकते अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच शिवसेनेच्या निर्णयावर भाजप कशी प्रतिक्रिया हे देखील बघणं उत्सुकतेचं असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात