मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी शरद पवार हेच योग्य उमेदवार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी शरद पवार हेच योग्य उमेदवार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

शिरुरमध्ये संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होत असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं.

शिरुरमध्ये संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होत असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं.

Sanjay Raut on Sharad Pawar: शिवसेना नेते (Shivsena Leader)संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. वाचा ते काय म्हणाले आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 14 जुलै: शिवसेना नेते (Shivsena Leader) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हेच उत्तम उमेदवार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करण्यासाठी विरोधकांकडे कोणताही चेहरा नाही आहे. जोपर्यंत विरोधी पक्षाकडे योग्य चेहरा नाही तोपर्यंत संधी नाही.

दरम्यान शिवसेनेचे राज्यसभा खासदार राऊतांनी पुढे मोठं वक्तव्य केलं. राऊत म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही मोठ्या चेहऱ्याशिवाय मोदींना हरवणं शक्य होणार नाही. मात्र नरेंद्र मोदींच्या तुलनेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेच उत्तम उमेदवार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा- सर्वात मोठी बातमी: शरद पवार असतील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार?

राष्ट्रपतीपदासाठीही शरद पवारांचं नाव?

निवडणूक रननीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांची गांधी कुटुंबियासोबत एक बैठक झाली. या बैठकीत राज्यातील निवडणुकाच नव्हे तर आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांवरही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावेळी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर जोर असल्याचं समजतंय.

हेही वाचा- पाकिस्तान हादरलं! कोहिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 13 जणांचा मृत्यू

या बैठकीत राज्यातील निवडणुकाच नव्हे तर आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांवरही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावेळी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर जोर असल्याचं समजतंय. प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या नावाला अधिकची पसंती आहे.

महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी दोन वेळा शरद पवारांची भेट घेतली होती. मंगळवारी किशोर यांनी राजधानी दिल्लीतील खासदार निवासस्थानी सोनिया गांधी , राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा यांची भेट घेतली. ही भेट पंजाब कॉंग्रेस किंवा आगामी विधानसभा निवडणुकांमधील सुरू असलेला कलह दूर करण्यासाठी करण्यात आली होती, असं सुरुवातीला बोललं जात होतं. दरम्यान कॉंग्रेसनं 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून त्यासाठी ही बैठक केल्याचंही म्हटलं जात होतं.

First published:

Tags: Congress, Mumbai, Sanjay raut, Sharad pawar, Shivsena