इस्लामाबाद, 14 जुलै: पाकिस्तान (Pakistan) मध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. बुधवारी पाकिस्तानच्या अप्पर कोहिस्तान (Upper Kohistan) भागात लेबर कॅम्पजवळ बसमध्ये (Bus Blast) स्फोट झाल्याचं वृत्त आहे. या स्फोटात 13 जणांचा (10 Died) मृत्यू झाला आहे. इतर अनेक जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
या बसमध्ये चिनी नागरिक होते. वृत्तसंस्था AFPच्या मते, मृतांमध्ये 6 चिनी अभियंता आणि सुरक्षा दलाचे 2 जवानही आहेत. पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार, बस दसू धरणावर काम करणाऱ्या चिनी अभियंता घेऊन जात होती. बसमध्ये 30 अभियंते आणि कर्मचारी होते. बसच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी सैनिक तैनात होते. अचानक बसमध्ये स्फोट झाला.
बॉम्ब कोठे ठेवला आणि त्याची घनता किती होती? सध्या यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. याबाबत चौकशी सुरू असल्याचे उपायुक्त मोहम्मद आरिफ यांनी सांगितले. स्फोटात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर आहे. हा आयईडी स्फोट असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा- सर्वात मोठी बातमी: शरद पवार असतील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार?
हा दहशतवादी हल्ला उत्तर पाकिस्तानमधील कोहिस्तानमध्ये झाला. पोलीस आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले जात आहे. अप्पर कोहिस्तानमध्ये सुरू असलेल्या दसू जलविद्युत प्रकल्पाच्या कामासाठी हे अभियंते जात होते.
मंगळवारी खैबर पख्तूनख्वा येथे दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केले. यामध्ये एका कॅप्टनससह 12 सैनिक ठार झाले. तसंच 15 जवानही जखमी झाले. दहशतवाद्यांनी 6 टेलिकॉम ऑपरेटरना ओलिस ठेवले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bomb Blast, Pakistan