मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुन्हा येणे जमेना म्हणून आयकर विभागाच्या धाडी, शरद पवारांची सडकून टीका

पुन्हा येणे जमेना म्हणून आयकर विभागाच्या धाडी, शरद पवारांची सडकून टीका

मी 12 वे ठिकाण हे मोहम्मद अली रोड असल्याचे सांगितले, त्यामुळे जातीय दंगली करण्याचे ज्यांचे इरादे होते, ते पुढे आले नाही...

मी 12 वे ठिकाण हे मोहम्मद अली रोड असल्याचे सांगितले, त्यामुळे जातीय दंगली करण्याचे ज्यांचे इरादे होते, ते पुढे आले नाही...

'मध्यमवर्गीय घरात इतके दिवस छापे टाकायला लावले. त्यांना पुढचा आदेश येईपर्यंत दबाव टाकून 5-5 दिवस छापे टाकायला लावले गेले, हे बरोबर नाही'

पुणे, 16 ऑक्टोबर :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या बहिणी आणि मुलगा पार्थ पवार यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली होती. पण, या प्रकरणी खुलासा करण्यासाठी भाजपचे नेते पुढे येत होते. माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष बोलत होते. मुळात ते पुन्हा येईन म्हणाले होते, पण ते जमेना म्हणून सरकार अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे', अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद (sharad pawar press conference) घेऊन आयकर विभागाने केलेल्या कारवाईवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला.

'अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी तब्बल 5 दिवस छापे मारले. मध्यमवर्गीय घरात इतके दिवस छापे टाकायला लावले. त्यांना पुढचा आदेश येईपर्यंत दबाव टाकून 5-5 दिवस छापे टाकायला लावले गेले, हे बरोबर नाही. दोन दिवस पाहुणे ठिक असतात पण आठ दिवस पाहुणे राहायला लागले तर वैताग येतो. अधिकाऱ्यांना वरून फोन यायचा. त्यानंतर ते मुक्काम वाढवून होते, असा धक्कादायक खुलासा पवार यांनी केला.

'Chala Hawa Yeu Dya' शोला या अभिनेत्याचा रामराम; दिसणार हिंदी कार्यक्रमात

'मुळात या प्रकरणात खुलासा करायला भाजपचे नेते पुढे येतात. माजी मुख्यमंत्री येतात. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष येतात. शासकीय यंत्रणेशी कामाशी काही तक्रार असेल तर त्या संबंधीत मंत्र्याने बोललं तर मी समजू शकतो. पण, हे नेतेही तिथे येऊन बोलायचे.  महाराष्ट्रातील सरकार हे दोन दिवस टिकणार नाही, असं सांगत होते. ते पुन्हा पुन्हा मी येणारच असं सांगत होते. पण त्यांचं काही जमेना त्यामुळे अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून राजकीय आकसाने या चौकशा सुरू झाल्या आहे' अशी टीकाही पवारांनी केली.

एक जुने भाजपचे नेते आणि त्यांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेले एकनाथ खडसे आहे. फडणवीस यांनी त्यांच्या हाताखाली काम केलं होतं. खडसे राष्ट्रवादीत आले. २० वर्षांपेक्षा जास्त ते भाजपचे नेते होते. २० वर्षांपासून जास्त पक्षाचे काम करणारे भाजपचे नेते होते. राष्ट्रवादीत आल्यानंतर भाजपकडून लगेच खटले सुरू झाले. त्यांच्या जावयावर गुन्हे दाखल केले गेले. त्यांच्या पत्नीचाही उल्लेख केला गेला. सुदैवाने खडसे यांचा संबंध नाही, हे कोर्टात दिसून आलं आहे. पक्ष सोडला की लगेच कारवाई केली जात आहे, कुटुंबाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहे' असं म्हणत पवार यांनी खडसेंची पाठराखण करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

एक माजी खासदार आणि माजी मुख्यमंत्री आहे,  त्यांनी एखादी गोष्ट बोलली की, लगेच यांच्यासाठी कारवाई करण्याचं सुरू होतं. हा नवीन प्रकार महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.  या गोष्टीचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे.     हे सुडाचं राजकारण केंद्राने थांबवावे, अशी मागणीही पवारांनी केली.

First published:

Tags: Uddhav Thackery, शरद पवार