तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत, प्रतिबंधीत क्षेत्रात मांसविक्रीवरून नगरसेवकानं केला गंभीर आरोप

तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत, प्रतिबंधीत क्षेत्रात मांसविक्रीवरून नगरसेवकानं केला गंभीर आरोप

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे.

  • Share this:

नागपूर, 11 जून: महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंवर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा..मुंबईत मान्सूनचा पहिला बळी? खेळता खेळता नाल्यात पडला 5 वर्षांचा चिमुरडा

शहरातील मोमिनपुरा कंटेनमेंट झोनमध्ये मांसविक्री कशी काय सुरु आहे? सदर विक्री ही महानगरपालिकेचे प्रयत्नातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परिसरात कत्तलखाना महानगरपालिकेने कसा काय सुरु ठेवला व याबाबत महापालिका आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणी दयाशंकर तिवारी यांनी केली आहे.

दुसरीकडे, महापालिकेने नगरसेवर दयाशंकर तिवारी यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. शासनाचे निर्देशानुसार कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेबाबत मनाई केलेली नाही. महाराष्ट्र शासनाचे 17 एप्रिलच्या आदेशामध्ये मांस, मासोळी इत्यादी बाबींची अनुज्ञेयता करण्यात आल्याबाबत स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनावर लावलेले विषयांकीत आरोप तथ्यहीन आहेत, असं महापालिकेनं म्हटलं आहे.

दुसरीकडे, नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट समजला जाणारा नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरात झालेल्या मटण पार्टीवरून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय आमने-सामने आले आहेत.

शहरातील नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरात बुधवारी 61 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. या परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 150 वर पोहोचली आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी मटण पार्टी झाली होती, त्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरात मटण पार्टी झालीच नसल्याचं पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी दावा केला आहे. यावरून दोन्ही अधिकारी आमने-सामने आले आहेत.

नागपूरच्या नाईक तलाव आणि बांगलादेश परिसारात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नाईक तलाव परिसरात मटण पार्टीवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्यास मटण पार्टी करणीभूत असल्याचं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. मात्र, आमच्या चौकशीत अशी कोणतीही बाब आढळली नसल्याचं नागपुरचे पोलिस आयुक्त यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा...प्रियकराच्या मदतीनं पत्नीनंच केली पतीची हत्या, 20 दिवसांनी असं फुटलं बिंग

काय म्हणाले महापालिका आयुक्त?

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, जो नागरिक पॉझिटिव्ह आला होता त्याच्या घरी लॉकडाऊन झाल्यानंतर एक पार्टी झाली होती. डेफिनेटली अशीच काहीतरी केस झाल्याशिवाय एवढा मोठा हॉटस्पॉट होऊ शकत नाही. मटण पार्टीमुळे नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नागपूर शहरातील नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. यावरून महापालिका व पोलिस विभागात एकमत दिसून आले नाही. नागपुरात मोमीनपुरानंतर हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. सध्या या परिसरात 150 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: June 11, 2020, 5:41 PM IST

ताज्या बातम्या