मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मन सुन्न करणारी घटना! बायकोनं प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याचा काढला असा काटा

मन सुन्न करणारी घटना! बायकोनं प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याचा काढला असा काटा

बुलडाणा, 11 जून: पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह शेतात पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नाही तर पती बेपत्ता असल्याचा बनाव करून आरोपी पत्नीनं पोलिसांत तक्रारही केली होती. मात्र, अखेर 20 दिवसांनी पत्नीचं बिंग फुटलं आहे.

काय आहे प्रकरण?

सागवण परिसरतील गायनंबर येथील मृत गणेश सरोजकर याची 25 मे रोजी हत्या झाली होती. गणेशचा मारेकरी दुसरा तिसरा कोणी नसून त्याची पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याचे दोन साथीदारांनी केल्याचं स्पष्ट झालं आहे. मारेकऱ्यांनी बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या आवळखेड शिवारात नेऊन गणेशची निर्घृण हत्या केली होती. नंतर त्याचा मृतदेह शेतात पुरला होता. आता पोलिसांनी गणेशचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला आहे. घटनेस्थळीच शवविच्छेदन करण्यात आलं आहे. या प्रकरणी आरोपी पत्नीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. प्रेम प्रकरणातून अशा घडलेल्या हत्येमुळे जिल्ह्यातील नागरिकांचे मन सुन्न झालं आहे.

हेही वाचा.. औरंगाबादमधील बहीण-भाऊ दुहेरी हत्याकांड! धक्कादायक माहिती उजेडात, चुलतभाऊ आणि मेव्हणा निघाला मारेकरी

मृत गणेश सरोजकर हा चोरी करण्यात पटाईत होता. त्याच्यावर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. तो नेहमी पत्नी लीला हिला मारहाण करत होता. त्याच्या या त्रासामुळे तिचे घराशेजारी राहणारा अनिलसोबत प्रेमसंबंध जुडले. याबाबत गणेशला भनक लागली होती. गणेशने लीला व अनिलला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यात आपण दोघे मिळून गणेशलाच संपवू असे प्रियकर जोडीने कट रचला. अनिलने लीलाला सांगितले की, तू गणेशला नाक्यावर घेऊन ये. तेथे तुला महेंद्र खिल्लारे हा भेटेल. त्याच्या गाडीवर बसून तुम्ही हातेडी येथे या. तेथे अनिलचा मामा म्हणजे अरुण निकाळजे यांच्या शेतात जाऊन त्याला दारुत विषारी औषध टाकून त्याचा मारण्याचा कट रचला.

गणेशला मारण्याचा दिवस अखेर ठरला...

25 मे रोजी पत्नी लीलाने गणेशला सोबत घेऊन माझे कुटुंब कल्याण ऑपरेशन करायचे आहे व त्यासाठी येथून सरकारी दवाखान्यात पैसे भेटणार आहे. ते पैसे घेण्यासाठी लीला व गणेश सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास महेंद्र खिल्लारे यांच्या मोटर सायकलवर बसून अनिलने सांगितल्याप्रमाणे हातेडी येथील अरुण निकाळजे यांच्या शेतात आले. सोबत दारूच्या बाटल्याही आणल्या होत्या. गणेश, अनिल, महेंद्र आणि अरुण त्यांनी सोबत दारू प्यायली. त्यापैकी एका बॉटलमध्ये विषारी औषध टाकले आणि ती बॉटल गणेशला पिण्यास दिली. ती पिल्यामुळे गणेशला अस्वस्थ वाटण्यास सुरुवात झाली. मात्र, एवढ्यावरच गणेश मरणार नाही, ही याची खात्री झाल्यानंतर महेंद्रच्या रुमालने चौघांनी मिळून फाशी देऊन जीवे मारले व त्याचा मृतदेह शेतात पुरला.

हेही वाचा..  विवाहितेने 2 लेकरांसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

याची माहिती मिळताच पोलिस स्टेशन बुलढाणा शहर यांनी तात्काळ गाडून ठेवलेल्या मृतदेहाचा पंचनामा करीता इन्व्हेष्टीगेशन टीम, तथा वैद्य वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करून त्या मृतदेहाचा पंचनामा करिता आवळखेड शिवारातील अरुण निकाळजे यांच्या शेतात जाऊन कुजलेल्या स्थितीत गणेशचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला. याबाबत लीला गणेश सरोजकर व तिच्या घरा शेजारी राहणारा अनिल प्रल्हाद सुरुशे यांच्या प्रेमसंबंधातून गणेश पांडुरंग सरोजकर याला मारण्यात आल्याचं स्पष्ट झालं. त्यावरून आरोपी लीला सरोजकर, अनिल सुरोशे, महेंद्र खिल्लारे आणि अरुण निकाळजे यांना जीवे मारल्या वरून विविध गुन्ह्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

First published:
top videos