Home /News /mumbai /

मुंबईत मान्सूनचा पहिला बळी? खेळता खेळता नाल्यात पडला 5 वर्षांचा चिमुरडा

मुंबईत मान्सूनचा पहिला बळी? खेळता खेळता नाल्यात पडला 5 वर्षांचा चिमुरडा

मान्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रगती केल्याचं चित्र दिसत असताना मुंबईत एका 5 वर्षांच्या चिमुरड्याचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे.

मुंबई, 11 जून: महाराष्ट्रात मान्सून (Monsoon 2020) दाखल झाला आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, ठाणे या भागांमध्ये मान्सून सक्रिय झाल्याचं वृत्त वेधशाळेकडून देण्यात आलं आहे. मान्सूनने मुंबई, पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रगती केल्याचं चित्र दिसत असताना मुंबईत एका 5 वर्षांच्या चिमुरड्याचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. पोलिस अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिक या मुलाचा शोध घेत आहेत. हेही वाचा...औरंगाबादमधील बहीण-भाऊ दुहेरी हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात घाटकोपर येथील सावित्रीबाई फुले नगर ही धक्कादायक घटना घडली आहे. हुसैन हमीद शेख असं मृत मुलाचं नाव असून तो खेळत खेळता नाल्यात पडला. नाल्याच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई-वडिलांना नाल्यात उडी मारली. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आई-वडिलांना नाल्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलिस पोहोचले असून गेल्या तीन तासांपासून मुलाचा शोध सुरू आहे. दरम्यान, पर्जन्य जलवाहिनी असलेल्या या नाल्याच्या भोवती भिंत बांधण्याचं काम गेले अनेक वर्षे रखडलं आहे. महापालिकेच्या बेजबाबदार पणामुळे हुसैन याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे, मान्सूनने कोकणातील हरणे, सोलापूरपर्यंत मान्सूनने मजल मारली आहे. संपूर्ण गोवा, कर्नाटक राज्यही व्यापले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे. मान्सूनने गोवा आणि कोकण किनारपट्टी व्यापल्याची माहिती गोवा वेधशाळेकडून मिळाली आहे. हेही वाचा.. प्रियकराच्या मदतीनं पत्नीनंच केली पतीची हत्या, 20 दिवसांनी असं फुटलं बिंग नेहमीप्रमाणे एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. मान्सूनची पुढची वाटचाल ही व्यवस्थित होती. मात्र दरम्यानच्या काळात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनची स्थिती भरकटली होती. पण आता परत मान्सून मूळ स्थितीवर आला असून मान्सूनने आज राज्यातील विविध जिल्हे व्यापले आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या