मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: आलिया-रणबीर राजस्थानमध्ये करणार साखरपुडा? हे खरं की अफवा!

VIDEO: आलिया-रणबीर राजस्थानमध्ये करणार साखरपुडा? हे खरं की अफवा!

सध्या सोशल मीडियावर रणबीर आणि आलियाबद्दल एक अफवा उडत आहेत की दोघेही याच महिन्यात 29 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. आता यात कितपत तथ्य आहे हे सांगणे थोडे कठीण आहे, कारण आलिया-रणबीरचे लग्न बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग आहे.

सध्या सोशल मीडियावर रणबीर आणि आलियाबद्दल एक अफवा उडत आहेत की दोघेही याच महिन्यात 29 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. आता यात कितपत तथ्य आहे हे सांगणे थोडे कठीण आहे, कारण आलिया-रणबीरचे लग्न बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग आहे.

सध्या सोशल मीडियावर रणबीर आणि आलियाबद्दल एक अफवा उडत आहेत की दोघेही याच महिन्यात 29 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. आता यात कितपत तथ्य आहे हे सांगणे थोडे कठीण आहे, कारण आलिया-रणबीरचे लग्न बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 13 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. दरम्यान, आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाबद्दल काही अफवा पसरल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर रणबीर आणि आलियाबद्दल एक अफवा उडत आहेत की दोघेही याच महिन्यात 29 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. आता यात कितपत तथ्य आहे हे सांगणे थोडे कठीण आहे, कारण आलिया-रणबीरचे लग्न बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इन्स्टावर रणबीरचा एक व्हिडीओ शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, 'आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 29 तारखेला राजस्थानमधील एका नवीन रिसॉर्टमध्ये एंगेजमेंट म्हणजे साखरपुडा करणार असल्याची अफवा सध्या चर्चेत आहे. मात्र या व्हिडीओत रणबीरचे एक्सप्रेशन सर्व काही सांगून जातात. एकदिवस रणबीर त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देईल याबद्दल काही सांगता येत नाही. परंतु आतापर्यंत त्यांचे लग्न राजस्थान या ठिकाणी होणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. मात्र सध्या त्या ठिकाणी लग्नासाठी एक खोली मिळणं देखील जवळजवळ अशक्य आहे, कारण बहुतेक जोडपी संपूर्ण रिसॉर्ट्स किंवा हॉटेल्स बुक करत आहेत. अनेक जण लग्न करण्यासाठी राजस्थानला पहिली पसंदी देताना दिसतात.

वाचा : 'पुढचा खडतर प्रवास मर्सेडिझने करावा...'; अमेय वाघची स्वत:ला खास गिफ्ट

सध्या आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. या चर्चेवरून सध्या एकच समोर येत आहे की, दोघेही पुढच्या वर्षी लग्न करू शकतात. आलिया सध्या अनेक प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. त्याचवेळी आलियाने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिचा दिवस कसा घालवते याची झलक तिच्या चाहत्यांना दाखवण्यात आली आहे. ती सांगतेय की, मी किती व्यस्त आहे हे लोकांना मला दाखवायचे नाही, अशा गोष्टी दाखवण्यात आणि सांगताना मला थोडा संकोच वाटतो. आलियाच्या चाहत्यांनीही तिला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा अभिनेत्रीने तिच्याच शैलीत उत्तर दिलं.

आलियाला जेव्हा एका चाहत्याने विचारले की, तुला कशामुळे प्रेरणा मिळते. तेव्हा आलियाने उत्तर दिले की, 'दोन गोष्टी, माझी स्वतःसाठीची स्वप्ने मला दररोज कठोर परिश्रम करण्यास प्रेरित करतात आणि माझ्या आयुष्यात असलेले इतर लोक, माझी टीम, माझे मित्र, माझे कुटुंब, माझे प्रियजन, मला प्रत्येकजण प्रेरणा देतात. प्रत्येक दिवस मला एक चांगला माणूस होण्याची प्रेरणा देत असल्याचे तिनं सांगितलं.

वाचा : विजयसिंह मोहिते पाटील यांचा 'मन झालं बाजिंद' मालिकेच्या टीमशी थेट संवाद

यादरम्यान, एका चाहत्याने आलिया भट्टला विचारले की तिने तिच्या फोनच्या वॉल पेपरवर काय ठेवले आहे. उत्तर म्हणून, आलिया आपला फोन कॅमेराकडे वळवते, ज्यामध्ये आलिया आणि रणबीरचा फोटो दिसत आहे. यावेळी शेकडो लोकांनी आलियाला विचारले की, 'ती लग्न कधी करणार आहे. या प्रश्नाचे थेट उत्तर न देता अभिनेत्रीने फक्त मान हलवली.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor