मुंबई : सध्या राहुल गांधी यांची भारतजोडो यात्रा महाराष्ट्रात आहेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात येऊन बारा दिवस पूर्ण झाले आहेत. यात्रेच्या दहाव्या दिवशी राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि वादाला तोंड फुटलं. सावरकरांचा मुद्दा आता राहुल गांधींसाठी हिट विकेट ठरणार की गेम चेंजर हे थोड्याचवेळात स्पष्ट होणार आहे. राहुल गांधी यांची आज शिर्डीमध्ये सभा होणार आहे, या सभेनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यापुर्वी जाणून घेऊयात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात आल्यापासून ते आजपर्यंतचा घटनाक्रम भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला तेलंगणामधून महाराष्ट्राच्या देगलुरमध्ये आली. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली त्याच दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबरला अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त विधान केलं. सत्तार यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आणि त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. वाद वाढल्यानंतर सत्तार यांनी माफी मागितली. 7 नोव्हेंबरलाच रात्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला, यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली. संजय राऊत यांना जामीन 7 नोव्हेंबरला रात्री उशीरा ही घटना घडल्यानंतर 8 नोव्हेंबरला दिवसभर याचे पडसाद पाहायला मिळाले. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तारांचं वक्तव्य आणि हर हर महादेव चित्रपटावरून आक्रमक झाली होती, पण अजित पवार नेमके कुठे आहेत, अशा चर्चाही याचवेळी सुरू होत्या. याच दिवशी संध्याकाळी संजय राऊत ईडीच्या कोठडीतून बाहेर आले आणि त्यांनी पूर्ण स्पेस घेतला. संजय राऊत लाईमलाईटमध्ये 100 दिवसांनी जेलबाहेर आल्यानंतर संजय राऊत 10 नोव्हेंबरला पूर्ण दिवस लाईमलाईटमध्ये राहिले. याच दिवशी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे काही निर्णय आपल्याला आवडले आहेत, आपण लवकरच फडणवीस यांची भेट घेणार आहोत, असं विधान केलं. हेही वाचा : …त्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही, शेलार पुन्हा आक्रमक, ठाकरे गटावरही हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांना अटक यानंतर 11 नोव्हेंबरला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्यामुळे आणि प्रेक्षकाला मारहाण केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली. याच दिवशी शिवसेनेचा 13 वा खासदार फुटला, गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. 12 नोव्हेंबरला जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळाला आणि ते बाहेर आले. अजित पवार माध्यमांसमोर आले 13 नोव्हेंबरच्या दिवशी अजित पवार सकाळी माध्यमांसमोर आले आणि त्यांनी आपण कुठे होतो याबाबत सांगितलं. 13 नोव्हेंबरच्या रात्री पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड अडचणीत आले. महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला. हेही वाचा : सावरकरांवरुन वाद पेटला; मनसे नेते नितीन सरदेसाई पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ते आक्रमक आव्हाडांकडून राजीनाम्याचा इशारा 14 नोव्हेंबरला विनयभंगाचा आरोप झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचा इशारा दिला, यानंतर राष्ट्रवादीकडून ठाण्यामध्ये आंदोलनं करण्यात आलं. 14 नोव्हेंबरच्या रात्री पुन्हा एकदा ठाण्यातच शिंदे-ठाकरे गट एकमेकांना भिडले, यावेळी तुफान राडा झाला. सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य त्यानंतर राहुल गांधी यांनी अचानक पुन्हा एकदा सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि ते चर्चेत आले. भाजप आक्रमक झाले असून, गेल्या तीन दिवसांपासूनच हाच मुद्दा आता माध्यमांच्या केंद्रस्थानी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.