जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...त्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही, शेलार पुन्हा आक्रमक, ठाकरे गटावरही हल्लाबोल

...त्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही, शेलार पुन्हा आक्रमक, ठाकरे गटावरही हल्लाबोल

आशिष शेलार

आशिष शेलार

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यावीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. आज पुन्हा एकदा भाजप नेते आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई :  राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यावीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. आज पुन्हा एकदा भाजप नेते आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी ठाकरे गटावर देखील निशाणा साधला आहे. सावरकरांच्या बाबतीत जेवढं अपमानस्पद करता येतील तेवढं काँग्रेसनं केल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी हे जाणून बूजून सावरकरांचा अपमान करत आहेत. मात्र त्यांनी लक्षात ठेवावं हा सावरकरांचा नाहीतर हिंदुस्थानातील तमाम देशभक्तांचा अपमान आहे असं शेलार यांनी म्हटलं आहे. तसेच ठाकरे गट सत्तेसाठी माती खात असल्याचा टोलाही शेलार यांनी लगावला आहे. नेमकं कय म्हटलं शेलार यांनी?  आशिष शेलार यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सावरकरांबद्दल जेवढं अपमानस्पद करता येतील तेवढं काँग्रेसनं केल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी जाणून बूजून सावरकरांचा अपमान करत आहेत. सावरकरांचा अपमान हा संपूर्ण देशभक्तांचा अपमान आहे. सावरकर हे महाराष्ट्राचे सुपूत्र होते. त्यामुळे हा अपमान महाराष्ट्राचा आहे. मराठी माणसांचा आहे. राहुल गांधी यांना मराठी माणूस कधीही माफ करणार नाही, असं शेलार यांनी म्हटलं आहे. हेही वाचा :   Rahul Gandhi : कुठे राडा तर कुठे निषेध राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद, सावरकरांचे गावही बंद ठाकरे गटावर निशाणा  दरम्यान याच प्रकरणावरून आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला देखील टोला लगावला आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणीशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला बाळासाहेबांनी जोडे मारले होते. मात्र आज त्यांचे नातू  त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरत आहेत. ठाकरे गट सत्तेसाठी माती खात आहे. त्यांनी बोटचेपी भूमिका घतेली असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. हेही वाचा :  सावरकरांवरुन वाद पेटला; मनसे नेते नितीन सरदेसाई पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ते आक्रमक आंदोलन पेटलं  राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वस्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. राज्यभरात आंदोलन सुरू आहे.  तर आता या वादात मनसेने देखील उडी घेतली आहे. राहुल गांधी यांच्या सभेत निषेध नोंदवण्यासाठी शेगावला जाण्याच्या तयारीत असलेल्या काही मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात