मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दोन गटांत राडा, शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांचे कार्यकर्ते भिडले

VIDEO: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दोन गटांत राडा, शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांचे कार्यकर्ते भिडले

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दोन गटांत राडा

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दोन गटांत राडा

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राडा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा, 21 नोव्हेंबर : सातारा जिल्हा बँकेची आज निवडणूक (Satara district central co operative bank election) होत आहे. या निवडणुकीत 21 पैकी 10 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, या मतदान प्रक्रियेदरम्यान दोन गटांत राडा झाल्याचं पहायला मिळालं. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि ज्ञानदेव रांजणे (Dnyandeo Ranjane) यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या होणाऱ्या मतदानामध्ये तणाव पाहायला मिळत आहे. जावली तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे चित्र मतदान केंद्रावर पहायला मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून जावली तालुक्यातील मेढा मतदान केंद्रावर तणाव कायम आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक होत असून 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यात 1964 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

वाचा : मिलिंद तेलतुंबडे करणार होता आत्मसमर्पण पण नेमकं काय घडलं की चकमकीत झाला ठार, पाहा Exclusive Report

जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडी नंतर दोन्ही राजेंच एकमेकांना हस्तांदोलन

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत साताऱ्याचे दोन्ही राजे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. या निवडी नंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट त्याच्या घरी जावून शुभेच्छा देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दोघांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल एकमेकांना यावेळी शुभेच्छा देखील दिल्या गेल्या.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. यामुळे निवडणुकीत काय घडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलं होतं. परंतु दोन्ही राजेंच्या झालेल्या भेटीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. उदयनराजेंना बिनविरोध करण्यात माझा कोणताही रोल नसुन उपमुख्यमंत्री अजित पवार सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि सहकारमंत्री बाळसाहेब पाटील यांचा हा निर्णय असल्याचं सांगत सातारा शहरातील नगरपालिकेची निवडणूक तसेच राजकीय वाटचालीमध्ये कोणतीच तडजोड झाली नसल्याच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं होतं.

वाचा : फडणवीसांनी मान्य केली काँग्रेस नेत्यांची विनंती, प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड?

जळगाव जिल्हा बँक निवडणूक

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 10 जागांसाठी आज 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होत आहे. बँकेच्या 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत . त्यामुळे उर्वरित दहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यातील काही जागांमध्येदेखील शेतकरी विकास पॅनलने महाविकास आघाडीच्या पॅनलच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काही ठिकाणी ही निवडणूक औपचारिकताच होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे यात मुक्ताईनगर येथील मतदान केंद्रात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष रोहीनी खडसे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष मंदाकिनी खडसे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर धरणगाव मतदान केंद्रावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच जळगाव मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

धुळे - नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक

धुळे - नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 10 जागांसाठी होत असलेल्या मतदानासाठी आज नंदुरबारमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सहा पैकी शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा या 3 विविध कार्यकारी सोसायटीच्या जागा विनविरोध झाल्या असुन आज उर्वरीत धडगाव, नवापूर आणि नंदुरबार या 3 जागांसाठी मतदान प्रक्रिया होत आहे. धुळे नंदुरबार मध्यवर्ती बॅकेचे विभाजन होवून नंदुरबारसाठी स्वतंत्र मध्यवर्ती बॅक व्हावी ही शिवसनेची आक्रमक भुमिका राहीली होती. त्यामुळेच या बॅकेची निवडणुक बिनविरोध होवू शकलेली नाही. भाजपाचे प्राबल्य असलेल्या या बॅकेवर पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे  किसान संघर्ष पॅनलच्या माध्यमातुन विरोधी गट रिंगणात उतरला आहे.

First published:
top videos

    Tags: Election, NCP, Satara