मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

mlc election : फडणवीसांनी मान्य केली काँग्रेस नेत्यांची विनंती, प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड?

mlc election : फडणवीसांनी मान्य केली काँग्रेस नेत्यांची विनंती, प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड?

 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana Patole), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendara fadanvis) यांची गुरुवारी भेट घेतली होती.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 19 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीसाठी (mlc election maharashtra 2021) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून (congress) दिवंगत नेते राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Rajeev Satav)  यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच भाजपकडून संजय केणेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्याकडे विनंती केली होती. अखेरीस भाजपने आज जाहीर केलेल्या यादीत केणेकर यांचे नाव जाहीर झाले नाही. त्यामुळे प्रज्ञा सातव यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये  कोल्हापूरमधून अमन महाडिक, धुळ्यातून अमरिश पटेल, नागपूर मधून चंद्रशेखर बावनकुळे, अकोल्यातून वसंत  खंडेलवाल आणि मुंबईतून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण, संजय केणेकर यांचा उल्लेख टाळला आहे.

संजय केणेकर यांना प्रज्ञा सातव यांच्याविरोधात उमेदवारी दिली असून त्यांनी अर्जही दाखल केला आहे. पण, शरद रणपिसे यांच्या निधनानं जी जागा रिक्त झाली आहे, त्याजागी काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. एखाद्या नेत्याच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागा ही बिनविरोध निवडून आणल्याची परंपरा आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतली होती.

Flipkart ची हेल्थकेअर सेक्टरमध्ये एन्ट्री; ऑनलाईन औषधेही मागवता येणार

या भेटीच्या वेळी प्रज्ञा सातव यांची निवड बिनविरोध व्हावा यासाठी संजय केणेकर यांचा अर्ज मागे घ्यावा अशी विनंती केली होती. अखेर काँग्रेस नेत्यांची मध्यस्थी यशस्वी ठरल्याची चिन्ह आहे. आज भाजपने जाहीर केलेल्या यादीत संजय केणेकर यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाजपचे विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवार

१ कोल्हापूर- अमल महाडीक

२ धुळे नंदुरबार- अमरिष पटेल

३ नागपूर- चंद्रशेखर बावनकुळे

४ अकोला-वाशीम वसंत खंडेलवाल

५ मुंबई- राजहंस धनंजय सिंह

First published: