जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिकच्या माजी नगरसेवकांच्या शिंदे गट प्रवेशाने संजय राऊत संतप्त; म्हणाले ते दलाल..

नाशिकच्या माजी नगरसेवकांच्या शिंदे गट प्रवेशाने संजय राऊत संतप्त; म्हणाले ते दलाल..

संजय राऊत

संजय राऊत

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 डिसेंबर :  संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा  साधला आहे. शिंदे, फडणवीस सरकारकडून अद्यापही महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावरून संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच नाशिकमध्ये शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या 12 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजी नगरसेवक प्रवेशावर प्रतिक्रिया   नाशिकमध्ये शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. नाशिकमधील ठाकरे गटाच्या बारा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटात जाणारे ते माजी नगरसेवक दलाल असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला फटका   मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरातील महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये नाशिक महापालिकेचा देखील समावेश आहे. ठाकरे गटाने मुंबईसह नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा नाशिक दौरा पार पडला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच नाशिकच्या बारा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.  यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी संताप व्यक्त करताना ते माजी नगरसेवक दलाल असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात