जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'फडणवीस मला तुमचे सगळे प्रकरणं माहिती', संजय राऊतांचा मोठा इशारा

'फडणवीस मला तुमचे सगळे प्रकरणं माहिती', संजय राऊतांचा मोठा इशारा

'फडणवीस मला तुमचे सगळे प्रकरणं माहिती', संजय राऊतांचा मोठा इशारा

देवेंद्र फडणवीस यांची सगळी प्रकरणे आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे आपण कोणत्याही कारवाईला घाबरणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 जुलै : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. विशेष म्हणजे संजय राऊतांनी फडणवीस यांना मोठा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांची सगळी प्रकरणे आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे आपण कोणत्याही कारवाईला घाबरणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? “महाराष्ट्रातल्या घराघरातल्या महिलेचा हुंदका हा सुद्धा लाऊडस्पीकर आहे. आणि हा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही मिस्टर फडणवीस. तुम्ही माझ्यावर कोणतीही कारवाई करा. केंद्रीय तपास यंत्रणाची कारवाई करा. सीबीआय, ईडी किंवा अन्य कोणाचीही कारवाई करा. तुमचे सगळे कारस्थाने मला माहिती आहेत. मी कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार आहे”, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या टीकेबद्दल फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी राऊतांवर निशाणा साधला. “संजय राऊतांना आता तरी समज आली पाहिजे. त्यांनी पक्षाची काय अवस्था करुन टाकली. तुम्ही काय त्यांच्याबद्दल विचारता. एका सेन्सीबल माणसाबद्दल विचारा”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ( शिंदे गटात गेले, अवघ्या 24 तासात पुन्हा शिवसेनेत परतले; पुण्यातील सेना विभागप्रमुखांना अश्रू अनावर ) दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल पनवेल येथील भाजपच्या कार्यक्रमात भाषण करताना संजय राऊतांची खिल्ली उडवली होती. “तसे नऊ वाजता बोलणारे अलिकडच्या काळात कमी बोलायला लागले. कारण काय मला माहिती नाही. तुम्ही त्यांना शिव्या देवू नका प्लीज. त्यांचे आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा तेव्हा इतर कुणाचाच नाही. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी वैताग आणला. शिवसेनेच्या जनतेला त्यांनी वैताग आणला. सगळ्यांना त्यांनी वैताग आणला. म्हणजे सगळ्यांनी मिळवून ठरवलं की, हे लाऊडस्पीकर बंद करायचं असेल तर सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. तर खरोखर आपण त्यांना धन्यवादच दिले पाहिजेत”, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात