मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sanjay Raut Remark BJP: 'आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून', संजय राऊत यांचा भाजपला टोला

Sanjay Raut Remark BJP: 'आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून', संजय राऊत यांचा भाजपला टोला

 मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं? आज माझं वजन 102  किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा 128  होतो'

मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं? आज माझं वजन 102 किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा 128 होतो'

शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी प्रत्त्युतर दिलं आहे.

मुंबई, 02 डिसेंबर: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) दोन दिवसांच्या मुंबई (Mumbai) दौऱ्यावर होत्या. मात्र या दौऱ्यावरुन राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरु झालेत. बुधवारी महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना पश्चिम बंगालमध्ये काही गुंतवणूक वळवण्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मदत करत असल्याची शंका भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) व्यक्त केली. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी प्रत्त्युतर दिलं आहे.

दौऱ्यावर टीका करताना राज्यातील तरूणांना वडापाव विकायला लावणार आणि उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाणार आहात का? असा प्रश्न भाजपनं उपस्थित केला होता. या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलं.व्हायब्रंट गुजरातसाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत? मुंबईला ओरबाडून आत्मनिर्भर गुजरात होत असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलं.

काय म्हणाले भाजप

आदित्य ठाकरे आणि ममतांच्या भेटीची अधिकृत माहिती राज्य सरकारने जाहीर केली पाहिजे. हे एक कटकारस्‍थान असून इथले उद्योग पश्चिम बंगालमध्‍ये घेऊन जाण्‍यास सत्‍ताधारी शिवसेना मदत तर करीत नाही ना? असा सवाल आशिष शेलार यांनी केला होता. तसंच आशिष शेलार यांनी ट्वीट केलं होतं, त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास ममता बॅनर्जींना शिवसेना मदत करतेय का? असा सवाल उपस्थित केला होता. इथले उद्योग देऊन शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का? असाही सवाल त्यांनी विचारला होता.

भाजपच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर

संजय राऊतांनी भाजपच्या टीकेला उत्तर देताना vibrant Gujarat ची प्रसिद्ध झालेली जाहिरात ट्विट केली आहे. मुंबईला ओरबाडून आत्मनिर्भर बनण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आलेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपाच्या टिकेनंतर संजय राऊत यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी वृत्तपत्रातील एका जाहिरातीचा फोटो सोबत शेअर केला आहे.

हेही वाचा- IND vs NZ: मुंबई टेस्टमध्ये बदलणार विराटचं नशीब, 741 दिवसांची प्रतीक्षा संपणार!

vibrant Gujarat ची प्रसिद्ध झालेली जाहिरात ट्वीवट केली आहे. भाजपाचे बेगडी मुंबई प्रेम. ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतीना भेटायला आल्या तर पोटशूळ उठला. म्हणे मुंबईतील उद्योग पळवायला आल्यात.आज व्हायब्रंट गुजरातसाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत? मुंबईत त्यांचा रोड शो होतोय. आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Shivsena, Uddhav Thackeray (Politician)