मुंबई, 2 डिसेंबर : कानपूर टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टेस्टचे सर्वांना वेध लागले आहेत. या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) परतणार आहे. विराटनं टी20 वर्ल्ड कपनंतर ब्रेक घेतला होता. विराटच्या पुनरागमनानंतर टीम इंडियातील कोणत्या खेळाडूला वगळले जाईल याची चर्चा सध्या सुरू आहे. त्याचबरोबर आणखी एका गोष्टीकडं क्रिकेट फॅन्सचं लक्ष आहे.
विराट कोहलीची रनमशिन अशी ओळख आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर 70 शतक झळकावत ही ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर त्याला गेल्या दोन वर्षांमध्ये एकही शतक झळकावता आलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यानं शेवटचं शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेश विरुद्ध झळकावले होते. त्यानंतर त्याच्या शतकांना ब्रेक लागला आहे. या कालवधीमध्ये त्यानं डझनभर अर्धशतक झळकावली आहेत, पण यापैकी एकाचंही शतकामध्ये रूपांतर करणे त्याला जमले नाही.
मुंबईत नशीब बदलणार का?
विराट कोहलीनं शेवटचं शतक झळकावून आता 741 दिवस झाले आहेत. त्याची ही प्रतीक्षा मुंबई टेस्टमध्ये संपू शकते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) विराटचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यानं या मैदानावरील 4 टेस्टमध्ये 72.17 च्या सरासरीनं 433रन केले आहे. यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा रेकॉर्ड आहे. विराटनं याच मैदानात 2016 साली इंग्लंड विरुद्ध 235 रनची खेळी केली होती. तसंच 2011 साली भारतामधील पहिली टेस्ट मॅच देखील विराटनं वानखेडेवरच खेळली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या त्या मॅचमध्ये विराटनं दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.
IND vs NZ: टीम इंडियांच्या स्वप्नांवर पावसाचं पाणी! मुंबईतील हवामानामुळे दुसरी टेस्ट संकटात
पॉन्टिंगच्या बरोबरीची संधी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतक झळकावण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे. त्यानं 100 शतक झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंग 71 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पॉन्टिंगच्या या रेकॉर्डची बरोबरी करण्यापासून विराट फक्त 1 शतक दूर आहे. मुंबई टेस्टमध्ये विराटनं ही लांबलेली प्रतीक्षा संपवावी आणि पॉन्टिंगची बरोबरी करावी अशीच विराटची फॅन्सची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india, Virat kohli