जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli News : कारपेक्षाही जास्त आहे 'या' घोड्याची किंमत, पैलावानाप्रमाणे घेतली जाते खुराकाची काळजी, Video

Sangli News : कारपेक्षाही जास्त आहे 'या' घोड्याची किंमत, पैलावानाप्रमाणे घेतली जाते खुराकाची काळजी, Video

Sangli News : कारपेक्षाही जास्त आहे 'या' घोड्याची किंमत, पैलावानाप्रमाणे घेतली जाते खुराकाची काळजी, Video

सांगलीतील बेताब फर्मचे मालक मुजावर बंधू यांच्याकडील घोड्यांच्या किंमती या सेकंड हँड कारपेक्षाही जास्त आहेत.

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

    स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 2 मार्च : प्राण्यांवर प्रेम करणारी आणि त्याला घरच्या सदस्याचा दर्जा देणारी अनेक मंडळी आपण आजूबाजूला पाहतो. विशेषत: कुत्रा, मांजर हे प्राणी अनेक घरांमध्ये दिसतात. या प्राण्यांचे मालक त्यांचे खूप लाड करता. त्याचबरोबर तितकीच काळजीही घेतात. छंद जोपासणे ही गोष्ट सोपी दिसत असली तरी त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सांगलीतील मुजावर बंधूंनाही घोडे पााळण्याचा अनोखा छंद आहे. लाखात एक घोडा! सांगलीतील  बेताब फर्मचे मालक मुजावर बंधू त्यांच्या घोड्यांवरील प्रेमासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. दिवगंत शौकत मुजावर यांनी सर्वप्रथम घोडे पालनाचा छंद सुरू केला. त्यानंतर त्यानंतर त्यांची मुले सलीम शौकत मुजावर आणि जावेद शौकत मुजावर यांनी ही परंपरा जोपासली आहे. मुजावर बंधूंकडे सर्वात प्रतिष्ठित मानली जाणारी मारवाडी, सिंध काटेवडी आणि पंजाबी या जातीचे घोडे त्यांच्याकडे आहे. या घोड्यांची किंमत ऐकली तर तूमचे डोळे पांढरे होतील. प्रत्येक घोड्याची किंमत ही पाच ते सहा लाखांच्या घरात आहे. एखाद्या पैलवानाप्रमाणे त्याच्या खुराकाची काळजी घेतली जाते. त्यांच्या आहारात दररोज दूध, तूप, गहू, चना आदी खाद्यांचा समावेश आहे. त्याचा सांभाळ देखील खूप महत्त्वाचा आहे. घोड्यांची स्वच्छता तसेच दररोज मालिश करून त्याची निगा राखली जाते. …आणि अचानक दिसली 2 बछड्यांसह वाघाची संपूर्ण फॅमिली! पाहा ताडोबातील दुर्मीळ Video

     मुजावर यांच्याकडील काही घोड्यांच्या किंमती तर सेकंड हँड कारच्या किमतीपेक्षाही जास्त आहेत. येथील मारवाडी घोडा 5 लाख, सिंध घोडा 6 लाख, काटेवाडी घोडा 3 ते 4 लाख तर पंजाबी घोड्याची किंमत 5 ते 6 लाख इतकी आहे.

    घोड्यांना मोठी मागणी! या घोड्यांना प्रदर्शन तसंच लग्न समारंभात मोठी मागणी असते. लग्नाच्या वरातीत घोड्यावर स्वार होऊन येण्याचा नावरदेवाचा मान असतो त्यामुळे हजारो रुपयांचे भाडे घेतले जाते. मध्यंतरी कोरोनाच्या काळात घोड्यांच्या व्यवसायावर मोठे संकट आले होते. नागपूर जवळचं वाघाचं घर, ‘जंगल बुक’शी आहे खास कनेक्शन! Video लग्न समारंभाला असलेली बंधने, वरातीला बंदी यामुळे घोडा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. वेळप्रसंगी पदरमोड करून हजारो रुपयांचा खुराक या घोड्यांना द्यावा लागत होता. आता दोन वर्षानी निर्बंध हटल्यानंतर आता हा व्यवसाय पूर्वपदावर आला आहे. महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात घोडे सांभाळण्याचा छंद मोठ्या प्रमाणात केला जातो. पण, हा छंद सोपा नाही. त्यासाठी मोठ्या कष्टाची गरज आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात