विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 1 मार्च : सर्वत्र उन्हाळ्याची चाहूल लागली असून वातावरणातील तापमान देखील वाढत आहे. या उष्णतेच्या झळा मनुष्यांप्रमाणेच वन्यजीवांना देखील सोसाव्या लागत आहेत. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा बफर वनक्षेत्रात वाघाचे संपूर्ण कुटुंब पाण्याच्या शोधात पाणवठयावर आले होते. वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजीत मडावी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. जुनाबाई वाघीण दागोबा वाघ आणि त्यांचे दोन बछडे यांचा मुक्त संचार या पाणवठ्यावर बघायला मिळत आहे. दुग्धशर्करा योग उन्हाळ्यातील हंगामात वन्यजीवांच्या दर्शनासाठी नैसर्गिक पानवठे एक हक्काची जागा मानल्या जाते. वाघांच्या एक झलक दर्शनासाठी पर्यटक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र एकाच ठिकाणी वाघाचे संपूर्ण कुटुंब बघायला मिळणं हा म्हणजे दुग्धशर्करा योगचं म्हणावा लागेल. वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजीत मडावी यांच्यासोबत हा योग घडला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आपल्या कुटुंबासोबत सफारीला गेले असता ताडोबा वनक्षेत्रातील कोलारा बफर झोन मध्ये जुनाबाई वाघीण, दागोबा वाघ, आणि तिचे दोन बछडे असे संपूर्ण कुटुंब जंगलातील पाणवठयावर आले होते. नागपूर जवळचं वाघाचं घर, ‘जंगल बुक’शी आहे खास कनेक्शन! Video भल्या भल्यांना भुरळ पाडणाऱ्या पट्टेदार वाघोबांच्या दर्शनासाठी विदर्भात असलेले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे सर्वांच्याच आवडीचे ठिकाण आहे. ताडोबा हा देशातील प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहे. बांबूचे घनदाट जंगल, येथील जैवविविधता, संपन्न असे वनक्षेत्र, असंख्य नानविविध वन्यजीव प्राणी या सर्व सौंदर्यामुळे इथं येणारा पर्यटक रिकाम्या हाती जात नाही.
ताडोबाचे जंगल जंगल 1,750 चौ.कि.मी. मध्ये पसरलेले आहे आणि जंगलमध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला सर्व दिशेवरून एकूण 19 प्रवेशद्वार आहेत. सध्या रोज वाढणाऱ्या तापमानामुळे मनुष्यासह वन्यजीवांची देखील अंगाची लाही लाही होत आहे. जंगलातील पानवठयावर वन्यजीव विसाव्यासाठी आश्रय शोधत आहे. मी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा बफर क्षेत्रात माझ्या कुटुंबासह सफारीवर गेलो होतो. त्यावेळी मला वाघाचे संपूर्ण कुटुंब बघायला मिळाले. आजवरच्या जंगल सफारीच्या अनुभवात हा अनुभव सर्वात अविस्मरणीय व आनंददायी होता असे मडावी यांनी व्यक्त केले.