जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Success Story: 'ती' रिस्क ठरली निर्णायक, टेम्पो चालकाचा मुलगा MPSC परीक्षेत राज्यात पहिला! Video

Success Story: 'ती' रिस्क ठरली निर्णायक, टेम्पो चालकाचा मुलगा MPSC परीक्षेत राज्यात पहिला! Video

Success Story: 'ती' रिस्क ठरली निर्णायक, टेम्पो चालकाचा मुलगा MPSC परीक्षेत राज्यात पहिला! Video

नुकताच MPSC राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सांगलीच्या प्रमोद चौगुले यांनी सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक मिळवला आहे.

  • -MIN READ Sangli Miraj Kupwad,Sangli,Maharashtra
  • Last Updated :

    स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 1 मार्च: आव्हानांना सामोरं जाण्याचं धाडस दाखवलं तर यशाला गवसणी घालता येते, हेच सांगलीच्या तरुणानं दाखवून दिले आहे. नुकताच MPSC राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सांगलीच्या प्रमोद चौगुले या तरुणाने सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे भारत पेट्रोलियममधील नोकरी सोडून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला होता. आपला निर्णय योग्य ठरवत प्रमोद यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांचे कौतुक होत आहे. खडतर परिस्थितीतून शिक्षण प्रमोद यांचं मुळ गाव मिरज तालुक्यातील सोनी हे आहे. वडील बाळासाहेब चौगुले हे टेम्पो चालक आहेत. तर आई शिवणकाम करून संसाराचा गाढा चालवत होत्या. घरची परिस्थिती बेताची असताना त्यांनी दोन्ही मुलांना शिक्षण दिलं. प्रमोदचं प्राथमिक शिक्षण सोनी गावातच झालं. तर पुढील शिक्षण नवोदय विद्यालयात झालं. त्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.

    News18लोकमत
    News18लोकमत

    रिस्क घेतली आणि यश मिळालं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर प्रमोद यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. भारत कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी पत्करली. नोकरी करत असतानाच UPSC आणि MPSC परीक्षा देण्याची त्यांची इच्छा झाली. त्यासाठी त्यांनी रिस्क घेत 2015 मध्ये भारत कॉर्पोरेशनमधील नोकरी सोडली. UPSC परीक्षेचा अभ्यास सुरू केला. मात्र, लवकर यश मिळालं नाही. तरीही अपयशाने खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर राज्यसेवा परीक्षा 2020 मध्ये त्यांना घवघवीत यश मिळालं. म्हणून दुसऱ्यांदा दिली परीक्षा राज्यसेवा परीक्षा 2020 चा गेल्यावर्षी निकाल लागला. त्यामध्ये प्रमोद यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला. यामध्ये उद्योग उपसंचालक म्हणून त्यांची निवड झाली. परंतु, त्यांच्या आवडीची पोलीस अधीक्षक ही पोस्ट तेव्हा नव्हती. त्यामुळे त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी लक्षणीय मिळवत सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला येण्याचा पराक्रम केला आहे. राज्यात पहिला, मात्र DSP च्या स्वप्नासाठी पुन्हा दिली परीक्षा; अखेर सांगलीच्या प्रमोदने मिळवलंच! संकटातही ध्येयाचा पाठलाग स्पर्धा परीक्षा करत असतानाही प्रमोद यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. नोकरी सोडून अभ्यास करूनही यश मिळत नव्हतं. तर सांगलीमध्ये आलेल्या पुरात प्रमोद यांचं संपूर्ण घर वाहून गेलं होतं. तसंच कोरोनाकाळात त्यांच्या कुटुंबाला कोरोनानं गाठलं होतं. मात्र, या संकटातही प्रमोद यांनी ध्येयाचा पाठलाग सोडला नाही. त्यामुळे कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी MPSC परीक्षेत बाजी मारली. त्यांचं हे यश राज्यातील आणि देशातील अनेक तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणारं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात