जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दुष्काळी भागात फुलली स्ट्रॉबेरीची शेती, पाहा कशी झाली कमाल! Video

दुष्काळी भागात फुलली स्ट्रॉबेरीची शेती, पाहा कशी झाली कमाल! Video

दुष्काळी भागात फुलली स्ट्रॉबेरीची शेती, पाहा कशी झाली कमाल! Video

दुष्काळी खानापूर तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी आल्याने शेतीसाठी फायदा झाला आहे. घाटमाथ्यावरील शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची शेती केली आहे.

  • -MIN READ Sangli Miraj Kupwad,Sangli,Maharashtra
  • Last Updated :

    स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 16 फेब्रुवारी: सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी हे दुष्काळी तालुके आहेत. याच पूर्व भागात टेंभू योजनेतून कृष्णेचे पाणी आल्याने शेतकऱ्यांचे जनजीवनच बदलून गेले आहे. बदललेले पर्जन्यमान, योजनेचे पाणी यामुळे आधी कुसळ सुद्धा उगवत नसलेल्या जमिनीत आता उसाच्या शेतीसह नवनवीन प्रयोग शेतकरी करू लागले आहेत. यातच आता सांगलीतील खानापूरच्या घाटमाथ्यावर स्ट्राबेरीची शेती फुललेली आहे. घाटमाथ्यावरील राहुल भगत या युवा शेतकऱ्यांने या भागात स्ट्राबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    खानापूरचा घाटमाथा दुष्काळी पट्टा २०१६ पर्यंत आटपाडी आणि खानापूर तालुक्याचा घाटमाथा हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जात होता. या भागात शेतकऱ्यांचे डाळिंब आणि द्राक्ष हे प्रमुख पीक होते. कमी पाण्यात खडकाळ परिसरात देखील हे पीक येत असल्याने शेतकऱ्यांची त्याला मोठी पसंती होती. येथील डाळिंबाची परदेशात निर्यात होते. या भागाचे २०१६ नंतर चित्र पालटले. अतिवृष्टी, बदललेले पर्जन्यमान आणि टेंभू योजनेच्या पाण्यामुळे पडीक माळरानाचे नंदनवन झाले. एरवी जिल्ह्याच्या पश्चिम भागात घेतले जाणारे उसाचे पीक येथेही घेतले जाऊ लागले. साखर कारखाने उभारले गेले आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बदलले. त्यामुळे आता येथील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. Sangli : पिकांच्या वाढीला लागणारा महत्त्वाचा घटक महागला, शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलं, Video स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग खानापूर तालुक्यातील शेतकरी राहुल भगत यांनी असाच एक प्रयोग आपल्या शेतात केला. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या खानापुरात स्ट्रॉबेरीची लागवड केली. सुरुवातीला हे धाडसच वाटत होते. कारण स्ट्रॉबेरी लागवड आणि औषधाचा खर्च जास्त होता. लागवड आणि औषधासाठी जवळपास 4 लाख रुपयांचा खर्च झाला. त्यानंतर मात्र स्ट्रॉबेरी विक्रीसाठी तयार झाली. सांगली, कोल्हापूर बाजारपेठेत स्ट्रॉबेरी विक्रीसाठी गेली. यात भगत यांना खर्च जावून 3 लाख रुपयांचा फायदा झाला आहे. जपानी पद्धतीनं सांगली झाली हिरवीगार, 2 वर्षांमध्येच तयार झालं जंगल, Video अशी झाली लावगड भगत यांनी दीड एकरात स्ट्रॉबेरीची लागण केली. 4 महिन्यात सरासरी 14 टन उत्पादन मिळाले. दीड किलोला सरासरी 400 रुपये दर मिळाला. त्यामुळे चांगला फायदा झाल्याचे भगत यांनी सांगतिले. खानापूर सारख्या पाण्याची कमतरता असलेल्या भागात स्ट्रॉबेरी पिकवल्याने भगत यांचे कौतुक होत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात