जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवभक्तांनो शिवनेरीवर जाताय मग हा वाहतुकीचा मार्ग जाणून घ्या, पुणे पोलिसांचे आवाहन

शिवभक्तांनो शिवनेरीवर जाताय मग हा वाहतुकीचा मार्ग जाणून घ्या, पुणे पोलिसांचे आवाहन

शिवभक्तांनो शिवनेरीवर जाताय मग हा वाहतुकीचा मार्ग जाणून घ्या, पुणे पोलिसांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 17 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरातील पर्यटनप्रेमींचे मुख्य आकर्षण आहेत. यात शिवनेरी, रायगड व सिंधुदुर्ग हे महत्वाचे किल्ले आहेत.

जाहिरात

शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य ही भावना आणि आपले वैभव नव्यापिढी पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी शिवनेरीवर राज्यभरातील शिवप्रेमी येण्याची शक्यता आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील शिवनेरीवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

हे ही वाचा :  तब्बल 5 हजार वर्षांपूर्वीच्या रेस्टॉरंट-पबचा लागला शोध; त्याठिकाणी घडतात थरारक घटना

दरम्यान जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर 18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या भागातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी नारायणगाव येथे येथे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

तसेच अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागातून येणाऱ्या शिवभक्तांनी आळेफाटा मार्गे नारायणगाव येथे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील सर्वच शिवभक्तांनी नारायण गावहून किल्ले शिवनेरीकडे जाणाऱ्या जुन्नरकडे जाण्याऱ्या पुढे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा :  बैलगाडा शर्यतीचा अजबच थरार; चक्क घराच्या छतावर चढली बैलांची जोडी

जाहिरात

तसेच पुढे 10 किमी अंतरावर जयहिंद इंजिनियरींग कॉलेजच्या पुढे घोडेगाव फाटा येथे आल्यानंतर डावीकडे वळावे. पुढे खानापूर धामनखेड मार्गे जून्नर वडजरोडवरून धामणखेड फाटा येथे यावे. तेथे आल्यानंतर धामणखेड फाट्यावर आणि तेथे असणारे मैदान व परिसरात प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात आली आहे. दरम्यान तिथून गडावर दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आलेल्या वाटेने कोणताही गोंधळ न घालता मागे जाण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात