मराठी बातम्या /बातम्या /Viral /तब्बल 5 हजार वर्षांपूर्वीच्या रेस्टॉरंट-पबचा लागला शोध; त्याठिकाणी घडतात थरारक घटना

तब्बल 5 हजार वर्षांपूर्वीच्या रेस्टॉरंट-पबचा लागला शोध; त्याठिकाणी घडतात थरारक घटना

 व्हायरल

व्हायरल

असं म्हणतात पृथ्वीच्या पोटात अनेक प्राचीन मानवी संस्कृतींचे अवशेष दडलेले आहे. त्यापैकी काही अवशेष शोधण्यात मानवाला यश आलं आहे तर काही अवशेष अजूनही भूगर्भात पडून आहेत. असे अवशेष शोधण्याचं काम पुरातत्त्वशास्त्रज्ञ (आर्कियोलॉजिस्ट) करत असतात.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

    मुंबई, 16 फेब्रुवारी- असं म्हणतात पृथ्वीच्या पोटात अनेक प्राचीन मानवी संस्कृतींचे अवशेष दडलेले आहे. त्यापैकी काही अवशेष शोधण्यात मानवाला यश आलं आहे तर काही अवशेष अजूनही भूगर्भात पडून आहेत. असे अवशेष शोधण्याचं काम पुरातत्त्वशास्त्रज्ञ (आर्कियोलॉजिस्ट) करत असतात. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी दक्षिण इराकमध्ये अशीच एक मोहिती हाती घेतली होती. त्यांना पाच हजार वर्षे जुन्या दारूच्या अड्ड्याचा शोध लागला आहे. ज्याला आधुनिक लोक पब-रेस्टॉरंट म्हणून ओळखतात. यूएस-इटालियन पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या टीमनं आधुनिक इराकमधील नसीरियाह या शहराच्या ईशान्येला असलेल्या लागशमध्ये उत्खनन केलं आहे. लागशला प्राचीन सुमेरियन संस्कृतीतील शहरी केंद्र म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी शिल्लक असलेल्या पडक्या अवशेषांमध्ये पाच हजार वर्षे जुन्या दारूच्या अड्ड्याचा शोध लागला आहे. या ठिकाणी अनेक अवशेष सापडले आहेत. यावरून प्राचीन शहरांमध्ये सामान्य लोकांचं जीवन कसं होतं, याचा अभ्यास करणं शक्य होईल. 'झी न्यूज'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया आणि पिसा युनिव्हर्सिटीच्या संयुक्त टीमनं, प्रिमिटीव्ह रेफ्रिजरेशन सिस्टमच्या माध्यमातून हे अवशेष मिळवले आहेत. त्यांना एक मोठा ओव्हन, जेवायला बसताना वापरण्यात येणारे बेंच आणि सुमारे 150 सर्व्हिंग बाऊल्स सापडले आहेत. बाऊल्समध्ये मासे आणि प्राण्यांची हाडं देखील सापडली. याशिवाय, बिअरचे पुरावे देखील सापडले आहे. सुमेरियन लोकांमध्ये बिअर विशेष लोकप्रिय पेय होतं.

    (हे वाचा:आश्चर्य! 32 वर्षीय महिला झोपून उठताच बनली 17 वर्षांची मुलगी; हे कसं काय झालं? )

    प्रोजेक्ट डायरेक्टर हॉली पिटमॅन यांनी एएफपीला सांगितलं, "आम्हाला रेफ्रिजरेटर, शेकडो भांडी, लोक ज्यावर बसायचे असे बेंच आणि रेफ्रिजरेटरच्या मागे एक ओव्हन देखील सापडलं आहे. तो स्वयंपाक करण्यासाठी वापरला जात असावा. आमच्या मते ही जागा, एखाद्या पब-रेस्टॉरंटप्रमाणे असावी. कारण, सुमेरियन लोकांमध्ये बिअर फार लोकप्रिय होती. अगदी पाण्यापेक्षाही तिचा अधिक वापर होत असे."

    इसवीसन पूर्व 2700 च्या आसपास टॅव्हर्न (मधुशाळा) वापरणाऱ्या लोकांच्या व्यवसायांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी टीम उत्सुक असल्याचं प्रोजेक्ट डिरेक्टर पिटमन यांनी सांगितलं. या माध्यमातून प्राचीन शहरांच्या सामाजिक संरचनेवर प्रकाश टाकता येईल. नोव्हेंबर 2022 मध्ये पूर्ण झालेल्या या उत्खननादरम्यान घेतलेल्या नमुन्यांचे तपशीलवार विश्लेषण करण्यात सध्या पूर्ण टीम गुंतलेली आहे.

    ते पुढे म्हणाले, "प्राचीन शहरांच्या बाबतीत आपल्याला अद्याप बरीच माहिती मिळालेली नाही. आम्ही तेच तपासत आहोत. आम्हाला आशा आहे की, या मोठ्या शहरात राहणारे जे लोक उच्चभ्रू नव्हते ते कोणत्या प्रकारचे व्यवसाय करायचे आणि कसे राहत होते, याचा आम्हाला शोध लागेल."

    या साइटवर यूएस-इटालियन टीमसोबत काम केलेले इराकी पुरातत्त्वशास्त्रज्ञ बेकर अजाब वली यांनी सांगितलं की, "लागश हे दक्षिण इराकमधील सर्वात महत्त्वाचं शहर होतं. येथील रहिवासी शेती, पशुपालन, मासेमारी व्यवसायांसह आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीवर अवलंबून होते."

    First published:
    top videos

      Tags: Lokmat news 18, Viral news