सांगली, 28 जून: सध्या सगळीकडेच महागडे श्वान पाळण्याची क्रेझ आहे. काही हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत श्वानांची खरेदी विक्री होत असते. काही श्वानांना खास कामासाठी सांभाळले जाते. त्यांचा खुरकही वेगळाच असतो. त्याला पोषक आहार मिळाला तरच हे श्वान चांगले राहते. लॅबरोडॉग, बुलडॉग, जर्मन शेफर्ड, गोल्डन रिट्रायव्हर, पग यांसह अनेक श्वानांच्या डाएट बाबत योग्य ती काळजी घेण्याची गरज असते. श्वानांसाठी खुराक महत्त्वाचा सध्या मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातही श्वान पालकांची संख्या वाढत आहे. देशी श्वानांसह विविध विदेशी जातीच्या श्वानांकडेही अनेकांचा कल आहे. लॅब्रॉडॉर, डॉबरमॅन, ग्रेट डे इन, जर्मन शेफर्ड या सारख्या वेगवेगळ्या जातीच्या डॉग्सना लोकांची पसंती असते. मात्र, या श्वानांच्या आरोग्याची आणि खुराकाचीही काळजी घ्यावी लागते. श्वानांसाठी त्यांचा डाएट, खुराक महत्त्वाचा असतो.
व्हेज-नॉनव्हेज खुराक श्वानांच्या डाएटचा विचार केला तर व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही ठेवू शकता. श्वान म्हटलं की त्यांना नॉनव्हेज द्यावंच लागेल, असा अनेकांचा समज असतो. मात्र, तसं काही नसतं. तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचा खुराक श्वानांना देऊ शकता. पण त्यासाठी वेळ आणि वय यांचा विचार करून खुराक ठरावावा, असे सांगलीतील पशु चिकित्सक गोरखनाथ पाटील यांनी सांगितले. असा असावा डाएट बारा महिन्याच्या आतील श्वानाला पप्पी म्हटलं जातं. पप्पी लहान असताना त्याच्या शरीराची वाढ होत असते. तेव्हा त्याला थोड्या थोड्या अंतराने खुराक द्यावा लागतो. सहा महिन्याच्या पप्पीला सकाळी दोन वेळा आणि संध्याकाळी दोन वेळा असे चार वेळा अन्न द्यावे लागते. तो बारा महिन्याचा होईल तेव्हा त्याला तीनदा अन्न दिले तरी चालते, असे पशु चिकित्सक पाटील यांनी सांगितले. बोकडाच्या डोक्यावर खास खूण, शेतकऱ्याला लागली लॅाटरी; किती आहे किंमत? मैद्याचे पदार्थ टाळावेत श्वानांचा डाएट योग्य रित्या पाळावा. त्याला ऍसिडिटी होणार नाही याची काळजी घ्यावी. बरेच जण मैद्याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स देतात. तर हे प्रॉडक्ट्स चालत नाहीत किंवा ते पचले जात नाहीत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे त्वचेचे आजार होतात. गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स येतात, असा सल्लाही पाटील यांनी दिला आहे. तसेच अजून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण दूध देऊ शकता किंवा त्याच्या वयानुसार तुम्ही ते बंद हे करू शकता. पण त्याच्या दुधामधलं जे फॅट आहे ते कमीत कमी लागतं, असंही डॉक्टर सांगतात. नॉनव्हेज किती घालावं पाळीव श्वानांना नॉनव्हेजण आठवड्यातून दोन ते तीनदा देऊ शकता. रोजच त्याला नॉनव्हेज द्यावं असं नाही. तसेच तुम्ही आपल्या श्वानाला प्युअर व्हेज दिलं तरीही काही अडचण नाही. अगदी आपली भात भाजी आमटीही तुम्ही श्वानाला देऊ शकता, असेही पशु चिकित्सक पाटील यांनी सांगितले.