जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalna News: बोकडाच्या डोक्यावर खास खूण, शेतकऱ्याला लागली लॅाटरी; किती आहे किंमत?

Jalna News: बोकडाच्या डोक्यावर खास खूण, शेतकऱ्याला लागली लॅाटरी; किती आहे किंमत?

Jalna News: बोकडाच्या डोक्यावर खास खूण, शेतकऱ्याला लागली लॅाटरी; किती आहे किंमत?

बोकडाच्या डोक्यावर खास खूण असल्याने शेतकऱ्याला लॉटरी लागली आहे. बकऱ्याच्या संरक्षणासाठी चार माणसे ठेवण्यात आली आहेत.

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

जालना, 28 जून: देने वाला जब भी देता देता छप्पर फाडके, असा एक फिल्मी डायलॉग आपण ऐकला असेल. जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याबाबत हा डायलॉग खरा ठरलाय. अंबड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या बोकडाला चक्क लाखोंची बोली लागलीय. त्यामुळे या बोकडाच्या विक्रीतून शेतकऱ्याचे नशीबच पालटणार आहे. विशेष म्हणजे या बोकडाच्या दिमतीला सध्या चार माणसं कार्यरत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात जामखेड हे गाव आहे. येथील शेतकरी प्रदीप म्हस्के हे शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करतात. त्यांनी सहा शेळ्यांपासून हा व्यवसाय सुरू केला होता. यातील एका बकरीने बोकडाला जन्म दिला आणि प्रदीप यांचं नशिबच पालंटलंय. या बोकडाला लाखोंची मागणी आहे.

News18लोकमत
News18लोकमत

बोकडाच्या डोक्यावर विशिष्ट खून प्रदीप म्हस्के यांच्या या बोकडावर विशिष्ट खून आहे. ही बाब त्यांनी इतरांना सांगितली. जवळच्या जाणकार शेतकऱ्याने त्यांना हा बोकड खूप भाग्याचा असल्याचं सांगितलं. त्यामुळं त्यांनी या बोकडाचं चांगलं संगोपन केलं. त्याला मका आणि इतर पौष्टिक खाद्य दिलं. सध्या हा बोकड चौदा महिन्यांचा असून याला बाजारात चांगली मागणी आहे. चोरीच्या भितीने चौघांचं संरक्षण या बोकडाची चर्चा सर्वत्र झाली. त्याला बोलीही लाखोंची लागली. त्यामुळे बोकड चोरी जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे त्याच्या राखणीसाठी विशेष तजवीज करण्यात आली आहे. कुटूंबातील चार सदस्य या बोकडाच्या दिमतीला कायम हजर असतात. 24 तास त्याच्यावर लक्ष ठेवले जातेय. ‘लेकरांसह गावोगावी फिरलो, तेव्हा लोक आदराने ऐकायची, आज कुणी विचारेना’ Video 12 ते 15 लाख मिळण्याची अपेक्षा माझ्याकडे काही शेळ्या असून त्यातील एका शेळीला हा बोकड झाला. त्याच्या कपाळावरची खून बघून मला त्याचे पालनपोषण करण्याचा सल्ला एकाने दिला. आता हा बोकड चौदा महिन्यांचा झाला आहे. त्याला तीन लाखांपासून दहा लाखांपर्यंतची बोली लागली आहे. पण आम्हाला याच्या विक्रीतून 12 ते 15 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे, असे प्रदीप म्हस्के यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jalna , Local18 , Viral
  • First Published :
जाहिरात
जाहिरात