मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sangli Miraj Girl Death : लेकरांना जपा! 4 वर्षांची चिमुकली पाचव्या मजल्यावरून पडून मृृत्यू, सांगलीतील घटना

Sangli Miraj Girl Death : लेकरांना जपा! 4 वर्षांची चिमुकली पाचव्या मजल्यावरून पडून मृृत्यू, सांगलीतील घटना

मिरज शहरातील झारीबाग परिसरात पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे

मिरज शहरातील झारीबाग परिसरात पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे

मिरज शहरातील झारीबाग परिसरात पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli Miraj Kupwad, India

असिफ मुरसल(सांगली), 08फेब्रुवारी : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील झारीबाग परिसरात पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना काल (दि.07)संध्याकाळी घडली. यष्वी दीनेश देशमाने (वय 04 वर्षे) असे या मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिरज शहरातील झारीबाग परिसरातील बुधगावकर मळा येथे ही घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरजेतील क्षकिरण तज्ञ डॉ. निलेश देशमाने हे झारीबाग परिसरातील एका अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर राहतात. डॉ. देशमाने यांना दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी आजारी असल्याने देशमाने दाम्पत्याने सोमवारी रात्री तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. 

हे ही वाचा : Nashik Koyta Gang : बहिणीची छेड, जाब विचारायला गेलेल्या तरुणासोबत भयानक कृत्य; नाशिकमध्येही कोयता गँगची दहशत

मात्र यावेळी रुग्णालयात जात असताना त्यांची लहान मुलगी यशवी ही झोपेत असल्याने डॉ. देशमाने यांनी घराला बाहेरून कुलूप लावून गेले. परंतु ते बाहेर जात असताना गडबडीत गॅलरीचा दरवाजा मात्र बंद करण्यास विसरले होते.

थोड्या कालावधीनंतर यशविला जाग आली. ती पालकांना शोधत गॅलरीत गेली. त्याचवेळी ती पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी पहाटे तिचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस याबाबत तपास करण्यात येत आहे.

हे ही वाचा : रूम बुक करून भारतीय जवानाचे भयानक कृत्य, मृतदेह पाहून पोलिसही हादरले

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून या घटनेची नोंद महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास महात्मा गांधी पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Sangli, Sangli (City/Town/Village), Sangli news