मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Army Personal : रूम बुक करून भारतीय जवानाचे भयानक कृत्य, मृतदेह पाहून पोलिसही हादरले

Army Personal : रूम बुक करून भारतीय जवानाचे भयानक कृत्य, मृतदेह पाहून पोलिसही हादरले

खोली बंद असल्यामुळे हॉटेल मालकाने दरवाजा ठोठावल्यानंतर आतून कोणताही आवाज न आल्याने हॉटेलमधील लोकांना संशय आला.

खोली बंद असल्यामुळे हॉटेल मालकाने दरवाजा ठोठावल्यानंतर आतून कोणताही आवाज न आल्याने हॉटेलमधील लोकांना संशय आला.

खोली बंद असल्यामुळे हॉटेल मालकाने दरवाजा ठोठावल्यानंतर आतून कोणताही आवाज न आल्याने हॉटेलमधील लोकांना संशय आला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kerala, India

नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी : लष्करात तैनात असलेले नाईक अनिश कुमार सिंह यांनी हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हा जवान केरळचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. 1 फेब्रुवारीपासून ते या हॉटेलमध्ये थांबले होते. खोली बंद असल्यामुळे हॉटेल मालकाने दरवाजा ठोठावल्यानंतर आतून कोणताही आवाज न आल्याने हॉटेलमधील लोकांना संशय आला. दरम्यान याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. लष्कर आणि पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला तेव्हा जवानाचा मृतदेह बाथरूमच्या ग्रीलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला.

केरळ, अंबाला येथील रहिवासी असलेले अनिश कुमार सिंग सैन्यात नायक म्हणून तैनात होते. ते सुट्टीसाठी आपल्या घरी गेले होते. 1 फेब्रुवारी रोजी ते अंबाला कॅन्टोन्मेंट लालकुर्ती येथील हॉटेलमध्ये थांबले, त्यानी हॉटेलवाल्यांना आपली खोली दोन दिवसांसाठी बुक करण्यास सांगितले.

हे ही वाचा : Nashik Koyta Gang : बहिणीची छेड, जाब विचारायला गेलेल्या तरुणासोबत भयानक कृत्य; नाशिकमध्येही कोयता गँगची दहशत

परंतु दोन दिवसानंतर काहीच हालचाल नसल्याचे दिसून आल्यावर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना रूम क्रमांक 203 च्या बाथरूममध्ये मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. हॉटेल मालकाने सांगितले की, अनिश कुमार सिंगने रूम बुक करताना सांगितले होते की, त्याला दोन दिवस हॉटेलमध्ये राहायचे आहे आणि दोन दिवसांनी केरळला जाण्याची फ्लाइट आहे.

दोन दिवसांनी जवानाने रूमचे बुकिंग वाढवले. मंगळवारी सकाळी अनिश कुमार सिंग यांना खोली रिकामी करायची होती, मात्र ते खाली न आल्याने हॉटेल व्यवस्थापनाकडून वरच्या मजल्यावर जाऊन पाहणी केली. दरम्यान आवाज देऊनही आतून आवाज येत नसल्याने संशय आला. यामुळे त्यांनी पोलिसांना कळवले, त्यावरून संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

माहिती मिळताच लालकुर्ती पोलीस चौकीचे पोलीस हॉटेलवर पोहोचले त्यांनी लष्कर पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आधारकार्ड तपासल्यानंतर पोलिसांनीही आपल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. 

हे ही वाचा : Fake Website Online Fraud : आलिशान हॉटेलचे फोटो दाखवले, महाराष्ट्रातील 2 भामट्यांनी गुजरातमधील 20 जणांना लाखोंना लुटले

माहिती मिळताच पडवळ पोलीस ठाण्याचे एसएचओ जीत सिंग पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वरच्या मजल्यावर जाताना हॉटेलच्या रुम क्रमांक 203 मध्ये जवानाने बाथरूमच्या स्कायलाइटला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले.

First published:

Tags: Army, Haryana, Indian army, Kerala, Suicide case, Suicide news