नाशिक, 7 फेब्रुवारी : पुण्यानंतर अहमदनगरमध्ये देखील कोयता गँगचं लोण पसरल्याचं पहायला मिळाले. मात्र, यानंतर आता पुणे, अहमदनगरसोबत नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. नाशिकमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
बहिणीची छेड काढण्याचा जाब विचारायला गेलेल्या भावावर कोयत्याने वार केल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. इतकेच नव्हे तर बहिणीच्याही हातावरही वार केले गेले. कोयता गँगने केलेल्या या हल्ल्यात बहीण भाऊ दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
pune koyta gang : कोयता गँगचा मोठा कट उधळला, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
गंभीर जखमी झालेल्या दोन्ही बहिण भावाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. नाशिकमध्ये कोयता गँगच्या दहशतीने एकच खळबळ उडाली आहे.
अहमदनगरमध्येही कोयता गँगची दहशत -
अहमदनगर जिल्ह्यातील सुप्यात कोयता गँगने पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कोयता गँग सक्रिय झाल्यानं एमआयडीसी भागात भीतीचं वातावरण आहे. कोयता गँगमधील मुख्य आरोपी कैफ मन्यार याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्याला रांजणगाव गणपती येथून अटक करण्यात आली आहे. त्याला रात्री सुपा पोलीस स्टेशनला हजर करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nashik