सांगली, 13 डिसेंबर : द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात हजारो एकर शेती द्राक्ष लागवडीखाली आहे. अवकाळी पाऊस, धुके, आणि वेगवेगळ्या बुरशी अशा अनेक आव्हानांना तोंड देत आहेत. द्राक्ष बागायतदार शेतकरी मोठ्या कष्टाने लाखो रुपयांची कमाई करत देशाला परकीय चलन मिळवून देत आहे. पण या शेतकऱ्यांना रोज एका समस्येला तोंड द्यावे लागते आहे. यामुळे शेतकरीही हवालदिल झाला आहे. परंतु शेतकरी हार मानणाऱ्यामधील नाही त्याने देसी जुगाड वापरून समस्येला तोंड दिले आहे.
हे ही वाचा : स्व-संरक्षणासाठी 'इथं' दिलं जातं शिवकालीन शस्त्र कलेचं मोफत प्रशिक्षण,पाहा video
आता द्राक्ष बागांवर वटवाघळांच्या हल्ल्यांचे एक नवीनच संकट घोंघावत आहे. पण या हुशार शेतकऱ्यांनी त्यावर देखील एक शानदार उपाय शोधून काढला आहे. त्यांनी चक्क मासे पकडण्यासाठी कोळी लोक जी जाळी वापरतात ती जाळी द्राक्षबागांवर अंथरून वटवाघलांच्या होणाऱ्या हल्ल्यांना चांगलीच मात दिली आहे. वटवाघळे द्राक्ष बागेवर रात्रीची हल्ले करतात. आणि आपल्या टोकदार चोचीने द्राक्ष मणी फोडतात. सकाळी पाहिले तर बागेत द्राक्षांचा अक्षरशः सडा पडलेला दिसून येतो. आणि शेतकऱ्यांचें लाखों रुपयांचे नुकसान होते.
सांगली: वटवाघळांपासून द्राक्षे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा देशी जुगाड ! द्राक्ष बागांवर अंथरली चक्क मासे पकडण्याची जाळी pic.twitter.com/vbJQzHSbSh
— News18Lokmat (@News18lokmat) December 13, 2022
पण आता ही झाली अंथरल्याने वटवाघळे द्राक्षांच्या मन्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे द्राक्षबागांचे। नुकसान टळत आहे. यापूर्वी शेतकरी मोठे मोठ्या पॉवरचे बाब लावून वतवाघलांच्या हल्ल्यावर तोड काढण्याचा प्रयत्न करत होते. पण हे अत्यंत खर्चिक असल्याने सर्वच शेतकऱ्यांना शक्य होत नव्हते.
हे ही वाचा : Beed : तेलबिया पिकांची लागवड घटली, सूर्यफूल नामशेष होण्याच्या मार्गावर
फटाके लाऊन वटवाघळांना हुसकावून लावणे प्रॅक्टिकली शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी हा माशांची जाळी लावण्याचा जुगाड आता अंमलात आणला आहे. आणि तो चांगल्या प्रकारे वर्क आऊट होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान वाचत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.