जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed : तेलबिया पिकांची लागवड घटली, सूर्यफूल नामशेष होण्याच्या मार्गावर

Beed : तेलबिया पिकांची लागवड घटली, सूर्यफूल नामशेष होण्याच्या मार्गावर

Beed : तेलबिया पिकांची लागवड घटली, सूर्यफूल नामशेष होण्याच्या मार्गावर

मागील आठदहा वर्षांपासून तेलबिया असलेल्या करडई आणि सूर्यफुलाचे पिक जवळपास इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

    बीड, 13 डिसेंबर : शेतकरी आता आधुनिक शेती करू लागले आहेत. यात उत्पन्न कमी असलेल्या पिकांचा पेरा बंदच झाला आहे. मागील आठदहा वर्षांपासून तेलबिया असलेल्या करडई आणि सूर्यफुलाचे पिक जवळपास इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. बीड   जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील यंदाचे लागवड क्षेत्र शून्य टक्केच असल्याचे समोर आले आहे.   एकेकाळी मुख्य पीक असणारे करडी व सूर्यफूल आज जिल्ह्यातील धारूर तालुक्यामध्ये हद्दपार होण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहे. सततचा ओला दुष्काळ आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे धारूर तालुक्यामध्ये यावर्षी तेलबिया पिकांचा पेरा शून्य टक्के झाला आहे. धारूर  तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ असल्याने या ठिकाणी पाण्याची उपलब्धता अल्प प्रमाणात आहे. इतर भागाच्या तुलनेत या ठिकाणी शेतीतून म्हणावे असे उत्पन्न मिळत नाही. एकेकाळी जिल्ह्यात करडी व सूर्यफूल पिकवणारा तालुका म्हणून धारूरची ओळख होती. 2009 साली दोनशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तेलबिया पिकांची लागवड करण्यात आली होती. मात्र, यावर्षी ही लागवड शून्य टक्केचे असल्याची नोंद झाली आहे. बाजारभाव नाही शेतकरी आधुनिक शेतीकडे आपली वाटचाल करीत आहेत. पारंपारिक पिके शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे. अधिक उत्पन्नासाठी शेतकरी अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करीत आहे. तेलबिया पिकांसाठी खर्च अधिक असून म्हणावे तेवढे उत्पन्न हाती लागत नाही. सूर्यफूल, भुईमूग, जवस, यांना बाजारभाव देखील चांगला मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरवली आहे.     स्व-संरक्षणासाठी ‘इथं’ दिलं जातं शिवकालीन शस्त्र कलेचं मोफत प्रशिक्षण,पाहा video पर्यायी पिकांची निवड धारूर तालुक्यातील करडई , सूर्यफूल, भुईमूग, जवस या पिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. हे पिकं हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. आता शेतकरी हरभरा, गहू, ज्वारी याच पिकांचे सर्वाधिक उत्पन्न घेत आहेत. तालुक्यामध्ये तेलबिया पिकांचं सर्वाधिक उत्पादन मागील दहा वर्षांमध्ये घेतलं जात होतं मात्र यावर्षी त्याचा पेरा कमी प्रमाणात करण्यात आला असून शेतकऱ्यांना या मधून अधिक उत्पादन हाती मिळत नसल्यामुळे शेतकरी आता दुसऱ्या पिकांकडे मोर्चा वळवला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शरद शिंगारे यांनी दिली. Video : कोयता सोडून हाती घेतली लेखणी, ऊसतोड मजुराचा मुलगा बनला कवी! सहा वर्षांपासून लागवड बंद गेल्या 6 वर्षांपासून सूर्यफुलाची लागवड केलेली नाही. चांगली बाजारपेठ आणि अधिक भाव मिळत नसल्याचे पिकांची लागवड बंद केली आहे. या बदल्यात इतर पिकांची लागवड करून शेती सुरू असल्याचे शेतकरी जगनाथ थोरात यांनी सांगितले.  

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: beed , Local18
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात