जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / यंदाचा गुढी पाडवा होणार गोड, राज्यात आंबा दरात मोठी घसरण, असा आहे पेटीला दर

यंदाचा गुढी पाडवा होणार गोड, राज्यात आंबा दरात मोठी घसरण, असा आहे पेटीला दर

यंदाचा गुढी पाडवा होणार गोड, राज्यात आंबा दरात मोठी घसरण, असा आहे पेटीला दर

डिसेंबर आणि जानेवारी दरम्यान आंबा पिकाला चांगला मोहर फुटला असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून देण्यात येत होती.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 21 मार्च : डिसेंबर आणि जानेवारी दरम्यान आंबा पिकाला चांगला मोहर फुटला असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून देण्यात येत होती.  दरम्यान अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे ज्या काळात आंबा पिकाला फळे लागण्याची प्रक्रिया सुरू होते त्याचदरम्यान वादळी पावसामुळे आंबा पिकावर मोठा परिणाम झाला. मागच्या काही  दिवसातील वातावरण बदलामुळे आंबा पिकाचा मोहोर गळून पडल्याने आंबा उत्पादक शेतकरी हवादिल झाला आहे.

जाहिरात

याचबरोबर गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा मार्केटला आल्याने नागरिकांनी आंबा घेण्याची पसंदी  दर्शवली आहे. परंतु आंब्यावर बुरशीजन्य रोगाची लागण होत असल्याने आंबा उत्पादन घटत आहे. यामुळे आंब्याचे दर पुढील काही काळात वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस पडला तर मोठे नुकसान होण्याची चिंता बागायतदारांना सतावत आहे. यंदा आंबा पीक उशिरा येणार असून गतवर्षीपेक्षा 30 ते 40 टक्के उत्पादन घटणार असल्याची स्थिती आहे.

गुढीपाडव्याला हवाय इतरांपेक्षा वेगळा ड्रेस? ‘इथं’ संपेल तुमचा शोध,Video

पाडव्याच्या पूर्वसंध्येला सध्या बाजारात एक डझनाला आंबा अंदाजे 1 हजार ते 1500 रुपयांपर्यंत मिळत आहे. दरम्यान पुढील काही दिवस हाच दर राहण्याची शक्यता आहे. यामुळे आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. घाऊक बाजारात पेटीचा दर सरासरी तीन हजार रुपये आहे.

यंदा फेब्रुवारीपासूनच हापूस आंबा बाजारात दिसत होता. मार्चमध्ये त्यामध्ये थोडी वाढ झाली असली, तरी आवक कमीच आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या दोन दिवसांपूर्वी 19 पेट्या व 1190 बॉक्स हापूस आंब्याची आवक झाली होती.

जाहिरात

पेटीचा दर सरासरी तीन हजार रुपये तर बॉक्सचा दर सरासरी सहाशे रुपये राहिला. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी काळात हापूसची आवक तशी जेमतेमच राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे. साधारणता आणखी पंधरा ते वीस दिवसांनी आवक वाढण्याची शक्यता आहे.

पाडव्याला तुमचं मुल दिसेल सुंदर, सेलिब्रेटींची पसंती असलेल्या दुकानात करा मस्त खरेदी! Video
जाहिरात

गुढीपाडव्याला आंब्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर आवक थोडी वाढणार असली, तरी दरात वाढ होणार आहे. लहरी वातावरणामुळे वर्षाआड आंब्याचे पीक हाती येत असल्याची चिंता आहे. सध्याच्या वातावरणात मोहोर दिसत असला तरी तो फुलणारा नसल्‍याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात